
आज 21 ऑक्टोबर हा दिवस म्हणजे पोलिस स्मृती दिन (Police Commemoration Day. पोलीस कर्मचाऱ्यांची निष्ठा, सर्वोच्च बलिदानाचा सन्मान करण्यासाठी तसेच शहीद पोलिसांच्या शौर्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी, कर्तव्याची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून 'पोलिस स्मृती दिन' साजरा करण्याची रीत आहे. 21ऑक्टोबर 1959 रोजी लडाख सीमेवर 18 हजार फूट उंचीवर पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना शत्रूकडून झालेल्या हल्ल्यात 10 कर्मचारी हुतात्मा झाले तर 9 जखमी झाले होते. त्याची आठवण म्हणून भारतामध्ये 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन पाळला जातो. सध्या पोलिस दल मानवी शत्रूच्या आक्रमणासोबतच कोविड संकटात वायरस रूपी छुप्या शत्रूपासूनही आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी झटत होते त्यामुळे त्यांच्या प्रति आज आदर व्यक्त करण्यासाठी व्हॉट्सअॅप, फेसबूक, इंस्टाग्राम द्वारा ही HD Images शेअर करून आपली आदरांजली अर्पण करू शकता. Mumbai Police Band पथकाने वाजवली किशोर कुमार यांच्या ‘Mere Sapno Ki Rani’ गाण्याची धून, सोशल मीडियावर युजर्सकडून कौतुक
पोलिस स्मृती दिन HD Images




दरवर्षी चाणक्यपुरी येथील राष्ट्रीय स्तरावरील पोलिस स्मृतिस्थळावर पोलिस स्मृती दिन निमित्त विशेष परेड आयोजित केली जाते. आजच्या दिवसाचं औचित्य साधत सार्या शहीद पोलिसांना आदरांजली अर्पण केली जाते. त्याचं यंदा युट्युब चॅनल वरून थेट प्रक्षेपण करून देशातील नागरिकांनाही हा संपूर्ण सोहळा घरबसल्या पाहता येणार आहे.