Mumbai Police Band पथकाने वाजवली किशोर कुमार यांच्या  ‘Mere Sapno Ki Rani’ गाण्याची धून, सोशल मीडियावर युजर्सकडून कौतुक
मुंबई पोलिसांच्या बँड पथकाने वाजवली किशोर कुमार यांच्या ' मेरे सपनों की रानी' गाण्याची धून | (Photo Credits-Instagram)

मुंबई पोलीस (Mumbai Police) सोशल मीडियावर नेहमची सक्रीय असतात. अनेक लोकोपयोगी गोष्टी आणि जनजागृती बाबत ते सोशल मीडियाच्या (Social Media) ​माध्यमातून माहिती देत असतात. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांचे बँड (Mumbai Police Band) पथकही असेच चर्चेत असते. मुंबई पोलिसांच्या बँड पथकाने अनेक लोकप्रिय गाण्यांच्या धून सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरतात. मुंबई पोलिसांच्या बँड पथकाने नुकतीच किशोर कुमार यांच्या ‘मेरे सपनों की रानी’ (Mere Sapno Ki Rani) लोकप्रीय गिताची धून वाजवली. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर केला. या व्हिडिओचे जोरदार कौतुक होत आहे. अनेकांन हा व्हिडिओ शेअर केला आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे तर कित्येकांनी लाईक केले आहे.

मुंबई पोलिसांच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत दिसते की, मुंबई पोलिसांचा बँड राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेल्या लोकप्रिय गीताची धून वाजवत आहेत. ही धुन राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्या लोकप्रिय सीन सोबत जोडला आहे. 1996 मध्ये आलेल्या आराधना चित्रपटातील ‘मेरे सपनों की रानी’ या गितात राजेश खन्ना आणि शर्मिला टागोल रेल्वेने करत असलेल्या प्रवासादरम्यच्या सीनसोबत ही धून जोडण्यात आली आहे. (हेही वाचा, मुंबई पोलिसांनाही Money Heist ची भुरळ; Khakhi Band ने सादर केले 'Bella Ciao' थीम सॉंग (Watch Viral Video))

'आराधना' चित्रपटातील हे गीत किशोर कुमार यांनी गायले आहे. तर त्याला संगीत दिले आहे प्रसिद्ध संगितकार एसडी बर्मन यांनी. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, 'खाकी स्टुडिओ घेऊन येत आहे मुंबई पोलीस जवानांचे नवीन सादरीकरण, एस.डी. बर्मन आणि किशोर कुमार यांच्या सुरांच्या खजिन्यातील एक सदाबहार गाणे. मेरे सपनों की रानी'.

व्हिडिो

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

जवळपास चार मनिटांहून अधिक कालावधीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. एका युजर्सने बँड पथकातील कलाकारांचे कौतुक केले आहे. तर दुसऱ्या युजर्सने 'हे तर एकदम परफेक्ट असल्याचे म्हटले आहे.'