Police Commemoration Day 2020: भारतामध्ये 21 ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृतिदिन (Police Commemoration Day) म्हणून साजरा केला आहे. या दिवसाचं औचित्य साधून देशभरात आपलं कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या पोलिस कर्मचार्यांना आदरांजली अर्पण केली जाते. सध्या कोविड संकटकाळामध्ये कोविड योद्धा म्हणून फ्रंटलाईनवर उभ्या असलेल्या अनेक पोलिसांचा मृत्यू जीवघेण्या कोरोना संसर्गामुळे झाला आहे. दरम्यान आज त्यांच्याप्रती असलेल्या आदरभावाला वाट मोकळी करून देताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमवेत राजकीय नेते, सामान्य जनतेने पोलिसांच्या सेवेला सलाम करत मृत पोलिसांप्रती श्रद्धांजली अर्पण केली आहे. Police Commemoration Day 2020 Images: भारतीय शहीद पोलिस स्मृतिदिन निमित्त WhatsApp, Facebook Status द्वारा आदरांजली अर्पण करण्यासाठी खास इमेजेस!
दरम्यान 21 ऑक्टॉबर 1959 साली लद्दाख मध्ये चीनी सैनिकांसोबत लढताना 10 केंद्रीय राखीव दलाच्या जवानांना हौताम्य आलं. या वीर जवानांच्या शौर्याची दखल घेत त्यांची कर्तव्यनिष्ठा इतरांना प्रेरणादायी ठरावी याकरिता 21 ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृतिदिन म्हणून पाळला जाऊ लागला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Police Commemoration Day is about expressing gratitude to our police personnel and their families all across India. We pay tributes to all the police personnel martyred in the line of duty. Their sacrifice and service would always be remembered. pic.twitter.com/69gkT1yH24
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
#WATCH Delhi: Union Home Minister Amit Shah pays tribute to the police personnel who lost their lives in the line of duty, at National Police Memorial on #PoliceCommemorationDay2020 today. pic.twitter.com/Cd8Na04oNg
— ANI (@ANI) October 21, 2020
दिल्ली मध्ये आज सकाळी National Police Memorial वर पोलिसांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह पोहचले होते.
मुंबई पोलिस
देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता बलिदान देणाऱ्या शूर योद्धांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.#PoliceCommemorationDay
— Mumbai Police (@MumbaiPolice) October 21, 2020
महाराष्ट्र पोलिस
आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने आदरांजली.
हे राष्ट्र त्यांचे बलिदान कधीच विसरणार नाही.#PoliceCommemorationDay #PoliceCommemorationDay2020 pic.twitter.com/SgatxHLzzi
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) October 21, 2020
धीरज देशमुख
शहीद पोलिसांच्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी, कर्तव्याची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून #पोलीस_स्मृती_दिन आयोजिला जातो. देशासाठी कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलिसांना आणि त्यांच्या शौर्याला नमन. pic.twitter.com/81K7SsJcf9
— Dhiraj V Deshmukh (@MeDeshmukh) October 21, 2020
महाराष्ट्रामध्येही आज पोलिस स्मृतिदिन याचं औचित्य साधत विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. खास संचलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.