Police Martyrs Day 2020 Images in Marathi: भारतामध्ये 21 ऑक्टोबर हा दिवस पोलिस कर्मचार्यांसाठी विशेष असतो. पोलीस कर्मचाऱ्यांची निष्ठा, सर्वोच्च बलिदानाचा सन्मान करण्यासाठी तसेच शहीद पोलिसांच्या शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी, कर्तव्याची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून म्हणून हा दिवस पोलिस स्मृती दिन (Police Commemoration Day) म्हणून साजरा केला जातो. मागील 6 महिन्यांपासून कोविड 19 चा सामना करताना देखील आरोग्य यंत्रणेसोबत पोलिस दल खंबीरपणे जनतेच्या सुरक्षेसाठी उभे होते. आपलं कर्तव्य बजावताना अनेक पोलिसांचा जीव या आजाराच्या विळख्यात गेला. दरम्यान पोलिसांच्या त्याग,सेवा यांना आदरांजली अर्पण करण्याचा आजचा दिवस आहे. सोशल मीडियात आज तुम्हीदेखील व्हॉट्सअॅप, फेसबूक, इंस्टाग्राम द्वारा शहीद पोलिसांच्या प्रती आदरभाव व्यक्त करत ही मराठमोळी HD Images शेअर करून आपली आदरांजली अर्पण करू शकता. Police Commemoration Day 2020: PM नरेंद्र मोदी, अमित शाह समवेत मुंबई पोलिस यांची शहीद पोलिसांना आदरांजली!
21 ऑक्टोबर 1959 साली लद्दाख मध्ये चीनी सैनिकांसोबत लढताना 10 केंद्रीय राखीव दलाच्या जवानांना हौताम्य आलं. या वीर जवानांच्या शौर्याची दखल घेत त्यांची कर्तव्यनिष्ठा इतरांना प्रेरणादायी ठरावी याकरिता 21 ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृतिदिन म्हणून पाळला जाऊ लागला.
पोलिस स्मृतिदिन 2020 HD Images
आज दिल्लीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपली आदरांजली अर्पण केली आहे. तर मुंबईमध्ये नायगाव येथील पोलिस मुख्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला आहे. गेल्या वर्षभरात भारतातील विविध पोलिस दलांमधील 26 पोलिस अधिकारी आणि 240 पोलिस अंमलदारांना आपले कर्तव्य बजावत असतांना वीरगती प्राप्त झाली आहे.