पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल.देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पुल यांची आज पुण्यतिथि. पु.ल.देशपांडे हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात.गुळाचा गणपती, या सबकुछ पु. ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले.पु.ल. देशपांडे यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या भाषाप्रभुत्वाचे अनेक किस्से आहेत. त्यांच्यावर मराठीत भाई हा चित्रपट बनला आहे.या चित्रपटाचे दोन भाग आहेत.पुलं हे हजरजबाबीही होते. त्यामुळे त्यांची शेकडो विनोदी किस्से आहेत. (Maharana Pratap Jayanti 2019: मेवाडचे 13 वे राजपुत्र महाराणा प्रताप यांची 479 वी जयंती; जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी )
आज त्याच्या पुण्यतिथि निमित्त त्यांचे काही कथाकथनाचे व्हिडिओ पाहूयात जे तुम्हाला खळखळुन हसवतील.
असा मी असामी
म्हैस
पानवाला
ज्योतिष
अपुर्वाई
देशपांडे लहानपणापासूनच धष्टपुष्ट होते. वयाच्या दुसऱ्या वर्षी ते पाच वर्षांच्या मुलाएवढे दिसत होते. ते हुशार होते आणि सतत काही ना काही करत असत. त्यांना स्वस्थ बसण्यासाठी घरचे लोक पैसा देऊ करायचे, पण हे त्यांना जमले नाही. आजोबांनी लिहून दिलेले आणि पु.लं.नी पाठ केलेले दहा-पंधरा ओळींचे पहिले भाषण पु.लं.नी वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या शाळेत हावभावासहित खणखणीत आवाजात म्हणून दाखवले. सात वर्षे अशी भाषणे केल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षापासून देशपांडे स्वतःची भाषणे स्वतःच लिहायला लागले आणि इतरांनाही भाषणे आणि संवाद लिहून देऊ लागले.