Pandharpur Mandir | Photo Credits: Twitter

आज नववर्ष 2021 मधील पहिला दिवस. नववर्षाचा उत्साह सर्वत्र आहे. मात्र कोविड-19 संकटामुळे असलेल्या बंधनांमुळे सेलिब्रेशन अगदी साध्या पद्धतीने होत आहे. राज्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला असला तरी संकट अद्याप टळलेले नसल्याने तसंच कोविड-19 च्या नव्या स्ट्रेनचा धोका लक्षात घेत सर्वत्र सावधातना बाळगली जात आहे. दरम्यान, नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर (Pandharpur Vitthal Rukmini Mandir) सुंदररित्या सजवले गेले आहे. महत्त्वाचे सण, खास दिवस या निमित्ताने विठ्ठल रुक्मिमी मंदिरात फुलांची आरास, सजावट केली जाते. कोविड-19 संकटात मंदिर बंद असताना देखील ही परंपरा कायम ठेवण्यात आली होती.

नववर्ष 2021 च्या पहिल्या दिवशी मंदिरात पिवळ्या आणि केशरी रंगाच्या झेंडूच्या फुलांची सुरेख आरास करण्यात आली आहे. त्यावर विठ्ठलाच्या भाळी असलेला टिळा, टाळ, मृदुंग, तबला, ढोल यांची चित्रं साकारण्यात आली आहे. विठ्ठलाला केशरी, निळ्या, गुलाबी रंगाचे धोतर, सदरा, उपरणं असं सजवण्यात आलं आहे. तर गडद हिरव्या रंगाच्या साडीत रुक्मिणीमातेचे रुप खुलले आहे. (Diwali 2020: दिवाळी पाडवा आणि भाऊबीज निमित्त पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची सुंदर सजावट, Watch Video)

पहा व्हिडिओ:

यापूर्वी गणेश चतुर्थी, नवरात्रोत्सव, दिवाळी या निमित्ताने विठ्ठल रुक्णिमी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती.

दरम्यान, राज्यातील कोरोनाचा फैलाव आटोक्यात आला आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून 5 जानेवारी पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 या वेळात नाईट कर्फ्यू असणार आहे. तसंच कोरोना विषाणूच्या बदलेल्या रुपाचा धोका असल्याने विशेष काळजी घेण्याचे आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.