Pandharpur Ashadhi Wari 2021: आषाढी एकादशीसाठी पालख्या बसमधूनच येणार, वारीसाठी पायी चालत येण्यासाठी शानसाचा नकार
Pandharpur Wari 2021 | File Image)

Pandharpur Ashadhi Wari 2021: पंढरपूरातील आषाढी वारीसाठी यंदा पायी पालखी घेऊन जाण्यास शासनाकडून नकार दिला गेला आहे. तर पालख्या बसमधून घेऊन जाण्यास परवानगी असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. वाखरी ते पंढरपूर दीड किलोमीटर दिंडी पायी येणार असून एकादशीच्या दिवशी शहरातील 195 महाराज मंडळींना देवाचे मुखदर्शन करता येणार आहे. पायी वारीसाठी येण्याच्या निर्णयावर सरकार ठाम असल्याचे सांगण्यात आले आहे.(Haj Yatra 2021 Registration: हज यात्रेसाठी रजिस्ट्रेशन सुरु, पॅकेज घेण्यापूर्वी जाणून घ्या 'हे' नियम)

मानाच्या 10 पालखी सोहळ्यांसाठी यावर्षी देहू, आळंदी येथील प्रस्थान सोहळ्याकरिता प्रत्येकी 100 व उर्वरित आठ सोहळ्यांसाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येणार आहे. यामुळे पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या पालखी/दिंड्यांना प्रातिनिधीक स्वरुपात प्रस्थान सोहळ्याद्वारे आषाढी बागेमध्ये सहभागी होता येणार असून त्यांना त्यासाठी परवानगी दिली आहे. यावर्षी सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता दिली आहे.

शासकीय महापूजा गत वर्षीप्रमाणे मान्यता देण्यात येणार आहे. त्याचसोबत श्री विठ्टलास संतांच्या भेटीसठी सुद्धा हाच नियम लागू असणार आहे. श्रींच्या 24 तास दर्शनाबाबत नित्योपचार परंपरेनुसार सुरु ठेवून आषाढी यात्रा कालावधीमध्ये भाविकांसाठी दर्शन बंद ठेवले जाणार आहे.(Shivrajyabhishek Din 2021 Date: यंदा शिवराज्याभिषेक सोहळा 'शिवस्वराज्य दिन' म्हणून होणार साजरा; रायगडावर निनादणार महाराजांचा जयघोष)

एकादशीच्या दिवशी रथोत्सवास मंदिराच्या स्वतंत्र वाहनाने 10 मानकरी आणि मंदिर समितीचे 05 कर्मचारी असे 15 व्यक्तींना परवानगी असणार आहे. त्यावेळी सामाजिक अंतर राखून योग्य ती खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करण्यास परवानगी दिली आहे.  तसेच मानाच्या पालखी 40 वारकऱ्यांना संतांच्या पादुका भेटीची परवानगी दिली आहे. तर 2 बस आणि प्रत्येकी बसमध्ये 20 या प्रमाणे 40 वारकऱ्यांची संख्या निश्चित करण्यास परवानगी असणार आहे.