
Haj Yatra 2021: सौदी अरब सरकारन गेल्या वर्षी प्रमाणे यंदा सुद्धा फक्त देशातील नागरिकांना हज यात्रेसाठी परवानगी दिली आहे. यावेळी हज यात्रेसाठी तीन पॅकेज मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार ज्या लोकांना हज यात्रेसाठी यायचे आहे त्यांना ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करता येणार आहे. महिला सुद्धा मेहराम (पुरुषा व्यतिरिक्त) रजिस्ट्रेशन करु शकतात. अरब न्यूज रिपोर्ट्सनुसार, यावेळी हजसाठी रजिस्ट्रेशन रविवार दुपार पासून सुरु झाले आहे. सौदी अरब सरकार यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, यंदा सुद्धा गेल्या वर्षी प्रमाणे फक्त सौदीच्या नागरिकांना हज यात्रा करता येणार आहे. हे रजिस्ट्रेशन 23 जून रात्री 10 वाजेपर्यंत कायम असणार आहे. तीन पॅकेजसाठीची किंमत 16,560.50 सौदी रियाल (जवळजवळ सव्वा तीन लाख रुपये), 14,381.95 सौदी रियाल (2.80 लाख रुपये) आणि 12,113.95 सौदी रियाल (2.36 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे. यावर वॅट हा वेगळा स्विकारला जाणार आहे.
हज आणि उमरा मंत्रालयाच्या वेबासाइट नुसार, लोकांना बसच्या माध्यमातून पवित्र स्थळावर नेले जाणार आहे. प्रत्येक बसमध्ये कमीतकमी 20 प्रवासी असणार आहेत. हज यात्रेकरुंना मीना मध्ये तीन वेळचे जेवण आणि अराफात मध्ये नाश्ता आणि दुपारचे जेवण उपलब्ध करुन दिले जाणार आहे. मुजादलिफा मध्ये रात्री भोजन दिले जाणार आहे. मक्काच्या बाहेर यात्रेकरुंना खाणं बाहेर घेऊन येण्याची परवानगी नसणार आहे.
अर्ज एकदा स्विकारल्यानंतर चौकशीसाठी व्यक्तीला एक रजिस्ट्रेशन क्रमांक दिला जाणार आहे. अर्जदाराचे कोविड19 स्टेट्स सुनिश्चित केल्यानंतरच त्याला पेमेंट डिटेल्स आणि टेक्स्ट मेसेज पाठवला जाणार आहे. मंत्रालयाकडून असे ही स्पष्ट करण्यात आले आहे की, हजसाठी रजिस्ट्रेशन करणे म्हणजे त्याला परवानगी मिळणे असे होत नाही.(Hajj Pilgrimage 2021: यंदा फक्त 60 हजार स्थानिकांना हज यात्रेची परवानगी; Saudi Arabia चा मोठा निर्णय)
मंत्रालयाने असे म्हटले की, हज परमिट तेव्हाच दिले जाईल जेव्हा सर्व अर्ज आरोग्यासंबंधित नियमांची पूर्तता करावी. मात्र जर एखाद्याकडून त्याचे उल्लंघन केल्यास तर मंत्रालयाकडे त्याचा अर्ज रद्द करण्याचा अधिकार असणार आहे. हज यात्रेसाठी अर्ज करणाऱ्या यात्रेकरुने सुनिश्चित करावे की त्याने गेल्या 5 वर्षात ही यात्रा केली आहे की नाही. या व्यक्तीरिक्त त्याला कोणताही गंभीर आजार आणि कोविड19 झालेला नसावा.
शनिवारी सौदी अरब सरकारने स्पष्ट केले आहे की, यंदा फक्त देशातील नागरिकांनाच हज यात्रा करता येईल. फक्त 60 हजार यात्रेकरुंना यासाठी परवानगी असणार आहे. हज यात्रा करणाऱ्या अर्जदाराचे वय 18-65 वयोगटातील असावे. अर्जाची निवड करण्याचे काम 25 जून पासून सुरु होईल. मंत्रालयाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, अर्जदाराला पॅकेज निवडल्यानंतर तीन तासांमध्ये पैसे भरावे लागणार आहेत.