World Cancer Day 2024 Quotes: कर्करोग (Cancer) ही जागतिक स्तरावर वेगाने वाढणारी गंभीर आणि जीवघेणी आरोग्य समस्या आहे, ज्यामुळे दरवर्षी लाखो मृत्यू होतात. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजचा अंदाज आहे की 2017 मध्ये 95.6 लाख लोकांचा कर्करोगामुळे अकाली मृत्यू झाला. जगातील प्रत्येक सहावा मृत्यू कर्करोगामुळे होतो. वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिकता आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे कर्करोग हा आता असाध्य रोग राहिलेला नाही, पण तरीही त्याचा उपचार करणे सर्वसामान्यांसाठी अत्यंत अवघड आहे.
जगभरातील कर्करोगाच्या वाढत्या धोक्याबद्दल लोकांना जागरूक आणि शिक्षित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day 2024) साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिनानिमित्त Images, Messages, WhatsApp Status द्वारे तुम्ही या आजाराविरोधात लढण्यासाठी बळ देणारे खालील काही प्रेरणादायी कोट्स आपल्या मित्र-परिवारास, नातेवाईकांना शेअर करून शकता. (हेही वाचा - Poonam Pandey is ALIVE: पूनम पांडे जिवंत; गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाकडे लक्ष वेधण्यासाठी दिली मृत्यूची खोटी माहिती (Watch Video))
कर्करोगाशी दोन हात करण्यासाठी
कॅन्सरची जागरूकता आवश्यक आहे.
जागरूक राहा आणि कर्करोगाविरोधात लढा द्या!
जागतिक कर्करोग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कॅन्सरशी संघर्षच करायचा असेल तर
तो निधड्या मनाने करा
म्हणजे लढाच दिला नाही असं नाही होणार
जागतिक कर्करोग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
इच्छाशक्ती ही अशी शक्ती आहे ज्याचा तुम्ही कॅन्सरसारख्या आजारावर मात करू शकता. World Cancer Day 2024 च्या हार्दिक शुभेच्छा!
जगा आणि आनंदात राहा!
कॅन्सर झाल्यानंतर सर्वच संपलंय
असं अजिबात नाही,
सकारात्मकता मनात ठेवली तर
यातून बाहेर पडणं शक्य होईल...
जागतिक कर्करोग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
संथगतीने कासवासारखी आयुष्याची रेस
जिंकायची असेल तर सकारात्मक विचार करावा,
कॅन्सरला हरवणे होईल शक्य...
जागतिक कर्करोग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रेमाने जग जिंकता येते
तर कॅन्सर हा फक्त आजारच आहे
जागतिक कर्करोग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कर्करोगाचे अनेक प्रकार असू शकतात. कर्करोग हा ठराविक वयातचं होतो असं नाहीये. कर्करोगाचा धोका सर्व वयोगटातील लोकांना असू शकतो. लवकर उपचार घेणे हे कर्करोगामुळे मृत्यूचे धोका कमी करण्यात मदत करू शकते.