Kabir Das Jayanti 2020: हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमेला कबीर जयंती असते. कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध होते. संत कबीर यांचा जन्म इ.स. 1149 साली झाला असे कहीजण मानतात. तसेच काहींच्या मते त्यांचा जन्म 1399 मध्ये झाला. कबीर हे हिंदू संत आहेत की सुफी संत आहेत याबाबत अभ्यासकात एकमत नाही. असे असले तरी कबीरांच्या साहित्यिक रचना दोन्ही संप्रदायांना समान आदर देतात.
कबीरदास भारतातील एक महान कवी आणि समाजसुधारक होते. हिंदी साहित्याचे ते विव्दान होते. कबीर दास या नावाचा अर्थ महानतेशी जोडला गेला आहे. ते अर्थातच भारतातील महान कवींपैकी एक होते. जेव्हा कधी भारतातील धर्म, भाषा, संस्कृतीची चर्चा होते त्यावेळी कबीरदासजींचे नाव सर्वात वर घेतले जाते. कारण, कबीरदासजींनी आपल्या दोहयांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा प्रसार प्रचार केला. (हेही वाचा - Vat Purnima Vrat 2020: 5 जून ला साजरी होणार वटपौर्णिमा; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी)
संत कबीरांनी आपल्या दोहयांच्या माध्यमातून समाजात पसरलेल्या अंधश्रध्दा, चालिरीतींना, भेदभावाला दुर करण्याचा प्रयत्न केला आहे. संत कबीरांच्या मार्गावर चालणाऱ्या धार्मिक समुदायाला कबिरांचे सिध्दांत आणि उपदेश जीवनाचा आधार वाटतो. कबीरदास यांचे उपदेश हे कोणत्याही काळाकरता प्रेरणादायक आहेत. या उपदेशातून त्यांनी समस्त मानवजातीला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. त्यांनी समाजात पसरलेल्या वाईट चालिरीतींवर आपल्या उपदेशांमधुन कडाडुन विरोध केला. संत कबीरांचे उपदेश प्रत्येकाच्या मनात नव्या उर्जेचा संचार करतात.
संत कबीरांना अनेक भाषांचे ज्ञान होते. साधु संतांसमवेत ते कित्येक ठिकाणी भ्रमण करीत असतं. त्यामुळे त्यांना अनेक भाषांचे ज्ञान अवगत झाले होते. कबीर मुस्लिम कुटूंबात रहात होते, तरी ते आदिरामाचे उपासक होते. संत कबीर यांनी विवाह केलेला नव्हता. कमाल नावाचा मुलगा आणि कमाली नावाची मुलगी त्यांची मानलेली मुले होती. कबीर हे काशीत विणकर म्हणून काम करत होते. ते आयुष्यभर काशीमध्येच राहिले. मगहर येथे त्यांचा मृत्यू झाला.