Gadge Maharaj Punyatithi 2022 Images: डेबुजी झिंगराजी जानोरकर ज्यांना सामान्यतः संत गाडगे महाराज (Gadge Maharaj) आणि गाडगे बाबा (Gadge Baba) म्हणून ओळखले जाते. गाडगे बाबा हे एक समाजसुधारक आणि भटके सेवक होते. जे महाराष्ट्रात सामाजिक विकासासाठी साप्ताहिक उत्सव आयोजित करत असतं. त्यांनी त्यावेळी भारतीय ग्रामीण भागात बरीच सुधारणा केली आणि आजही अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत आहेत. 20 डिसेंबर रोजी त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते.
संत गाडगे महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेडगाव गावात एका धोबी कुटुंबात झाला. ते एक भटके सामाजिक शिक्षक होते, पायात फाटलेल्या चप्पल घेऊन ते पायी प्रवास करायचे. ते गावात शिरला की, लगेच गटारी आणि रस्ते साफ करायला सुरुवात करायचे. काम आटोपल्यावर गावाच्या स्वच्छतेसाठी ते स्वतः लोकांचे अभिनंदन करायचे. लोकांकडून जमा झालेल्या पैशातून महाराज गावोगावी शाळा, धर्मशाळा, रुग्णालये, प्राण्यांचे निवारे बांधत असत. संत गाडगे महाराज पुण्यतिथि निमित्त तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेजस डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Gadge Maharaj Punyatithi 2022: संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याविषयी काही आश्चर्यकारक तथ्ये, जाणून घ्या)
संत गाडगे महाराज पुण्यतिथिनिमित्त विनम्र अभिवादन!
ज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी
तळमळीने कार्य करणारे आधुनिक सत्पुरुष!
संत गाडगे महाराज पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन!
कर्मयोगी संत गाडगे बाबा यांना पुण्यस्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन!
स्वच्छतेतून ग्रामविकासाचा मार्ग दाखविणारे
थोर समाजसुधारक, ग्रामसुधारणेचे जनक
श्री संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी वंदन!
संत गाडगे महाराज पुण्यतिथि निमित्त त्रिवार अभिवादन!
संत गाडगे महाराज पुण्यतिथि निमित्त कोटो कोटी प्रणाम!
दरम्या, गावांची स्वच्छता केल्यानंतर संत गाडगे महाराज संध्याकाळी कीर्तनांचे आयोजन करायचे आणि आपल्या कीर्तनातून लोकोपयोगी आणि समाजकल्याणाचा संदेश देत. आपल्या कीर्तनात ते लोकांना अंधश्रद्धेच्या भावनांविरुद्ध प्रबोधन करत असतं.