Nag Panchami 2024 HD Images: महादेवाला प्रिय असलेला श्रावण महिना सुरू झाला आहे. पवित्र श्रावण महिन्यात अनेक मोठे सण साजरे केले जातात. दरवर्षी नागपंचमी (Nag Panchami 2024) हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची विधीनुसार पूजा केली जाते आणि त्याला दूधही अर्पण केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने व्यक्तीला नागदेवतेचा आशीर्वाद मिळतो आणि कालसर्प दोषापासूनही मुक्ती मिळते. सर्पदेवतेची पूजा केल्याने कुंडलीतील कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते, अशीही एक मान्यता आहे. नागपंचमीचा दिवस नागदेवतेला समर्पित असतो, म्हणून याला नागांचा सण असेही म्हणतात.
या दिवशी लोक नागदेवतेला दूध अर्पण करून पूजा करतात. यावर्षी नागपंचमीचा सण शुक्रवार, 9 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज साजरा करण्यात येत आहे. नागपंचमीनिमित्त खास Greetings, Messages, Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास श्रावण महिन्यातील पहिल्या सणाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचे आयुष्य आनंदी आणि मंगलदायी होवो,
नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!!
नागपंचमी निमित्त आपणास व आपल्या परिवारास मनपूर्वक शुभेच्छा!
नागपंचमीच्या सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा!
नागपंचमीच्या संदर्भात अनेक पौराणिक कथा आणि श्रद्धा प्रचलित आहेत. हिंदू धर्मात अनेक झाडे, वनस्पती, प्राणी, पक्षी यांना देवतांप्रमाणे पूजनीय मानले जाते. त्याच वेळी, सापांना पृथ्वीचे संरक्षक मानले जाते. पिकांना हानिकारक कीटक नियंत्रित करण्यासाठी साप महत्त्वाची भूमिका बजावतात.