
Mothers Day 2023 Marathi Quotes: मदर्स डे हा एक असा विशेष दिवस आहे जो जगभरातील मातांचा सन्मान करतो. यंदा 14 मे रोजी मदर्स डे साजरा करण्यात येणार आहे. या दिवसाविषयी प्रत्येकाच्या मनात वेगळी भावना आहे. कारण, या दिवशी आपल्याला आपल्या मातांसाठी कृतज्ञता, प्रेम आणि कौतुक व्यक्त करण्याची संधी मिळते. मदर्स डे जगभरात वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो. परंपरेनुसार, युनायटेड स्टेट्स सारख्या अनेक देशांमध्ये, तो मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो.
मदर्स डेचा उगम प्राचीन ग्रीसमध्ये झाला, जिथे मार्चच्या मध्यात रिया, देवतांची माता, उत्सव साजरा केला जात असे. ख्रिस्ती परंपरेने नंतर येशूची आई मेरीचा सन्मान करण्याचा एक मार्ग म्हणून हा उत्सव स्वीकारला आणि त्याचे नाव बदलून मदरिंग संडे असे ठेवले. युनायटेड स्टेट्समध्ये, मदर्स डे पहिल्यांदा 1908 मध्ये अॅना जार्विस यांनी साजरा केला. आई हा दिवस मातृदिन म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू केली, अशीही यामागील अख्यायिका आहे. मातृदिनाच्या दिवशी आईला खास मेसेज किंवा ग्रेंटिंज देऊन तुन्ही मातृदिनानिमित्त खास शुभेच्छा देऊ शकता. खालील Images, Messages, Wishes च्या माध्यमातून तुम्ही आपल्या आईला आईची महती सांगणारे खास कोट्स शेअर करून मातृदिनाच्या खास शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Mother's Day 2023 Date: यंदा 14 मे रोजी साजरा होणार 'मदर्स डे'; जाणून घ्या 'मातृदिना'चे महत्व व या दिवसाच्या सेलिब्रेशनचा इतिहास)
कौसल्येविण राम न झाला, देवकीपोटी कृष्ण जन्मला
शिवराजाचे चरित्र घडवी माय जिजाबाई
नकोस विसरू ऋण आईचे, स्वरूप माऊली पुण्याईचे
थोर पुरुष तो ठरून तियेचा होई उतराई
- ग. दि. माडगूळकर
मातृदिनाच्या शुभेच्छा!

‘आई माझा गुरू, आई माझे कल्पतरू, आईचे प्रेम आकाशाहून मोठे आणि सागराहूनही खोल आहे'
- साने गुरूजी
मातृदिनाच्या शुभेच्छा!

लेकराची माय असते, वासराची गाय असते,
दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते,
धरणीची ठाय असते, आई असते जन्माची शिदोरी,
सरतही नाही उरतही नाही'
- फ. मु. शिंदे
मातृदिनाच्या शुभेच्छा!

'दिला जन्म तू विश्व हे दाविलेस
किती कष्ट माये सुखे साहिलेस,
जिण्यालागी आकार माझ्या दिलास,
तुझ्या वंदितो माउली पाऊलांस'
- ग. दि. माडगूळकर
मातृदिनाच्या शुभेच्छा!

‘ठेच कान्हूला लागली, यशोदेच्या डोळा पाणी
राम ठुमकत चाले, कौसल्येच्या गळा पाणी,
देव झाला तान्हुला ग, कुशीत तू घ्याया,
तिथे आहेस तू आई, जिथे आहे माया'
- मंगेश पाडगावकर
मातृदिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात
मेतकूट कालवलेला मऊ तूपभात,
आई म्हणजे देव्हाऱ्यातले लक्ष्मीचे चित्र
सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र,
- शांताबाई शेळके
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मातृदिन साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे मातांच्या बिनशर्त प्रेम, काळजी आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करणे. आपल्या जीवनाला आकार देण्यामध्ये मातांची महत्त्वाच्या भूमिकेची असते. त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ मातृदिन साजरा करणं एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाहीये.