Mahatma Gandhi Punyatithi 2024 Quotes: महात्मा गांधी (Mahatma Gandhi) हे स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी (Mohandas Karamchand Gandhi) असं आहे. सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबून त्यांनी इंग्रजांना भारत सोडण्यास भाग पाडले. लोक त्यांना प्रेमाने बापू असं म्हणत असतं. महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यासाठी लढा दिला.
स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांचे निधन झाले. त्या संध्याकाळी बिर्ला हाऊसमधील गांधी स्मारकात प्रार्थना सुरू असताना नथुराम गोडसेने गांधीजींवर गोळ्या झाडल्या. 30 जानेवारी हा दिवस गांधीजींची पुण्यतिथी म्हणून इतिहासात कायमचा नोंदवला गेलाय दरवर्षी 30 जानेवारीला गांधीजींच्या पुण्यतिथीसोबतच शहीद दिनही साजरा केला जातो. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही व्हॉट्सअॅप स्टेटस, मेसेज, फेसबुक मेसेज द्वारे बापूंचे प्रेरणादायी विचार शेअर करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
तथापी, ज्या दिवशी महात्मा गांधी यांचा मृत्यू झाला, तो दिवस देशवासीय शहीद दिन म्हणून साजरा करतात. बापूंची पुण्यतिथी म्हणजेच 30 जानेवारी हा शहीद दिन म्हणून साजरी करून देश महात्मा गांधींना आदरांजली वाहतो. भारतात शहीद दिन भारतात दोनदा साजरा केला जातो. गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त 30 जानेवारीला शहीदांच्या स्मरणार्थ शहीद दिन साजरा केला जातो. याशिवाय 23 मार्च हा शहीद दिन म्हणूनही साजरा केला जातो.