Maghi Ganpati Invitation Card Format in Marathi: गणेश जयंती ही माघी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, हा सण माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला साजरा केला जातो. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये गणेश जयंती साजरी केली जाते. गणेश जयंती प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कोकणातील किनारी भागात माघ महिन्यात साजरी केली जाते. भारतातील बहुतेक भागात, भगवान गणेशाची जयंती भाद्रपद महिन्यात साजरी केली जाते आणि ती गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. माघ महिन्यात गणेश जयंती हा गणेशाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात गणेश जयंतीला (Maghi Ganesh Jayanti Invitation Card In Marathi) माघ शुक्ल चतुर्थी, तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात.
यंदा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 1 फेब्रुवारी रोजी येत आहे. त्यामुळे 1 फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल. या वर्षी गणपती पूजनाचा मुहूर्त 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजून 38 मिनिटापासून दुपारी 1 वाजून 46 मिनिटापर्यंत असणार आहे. महाराष्ट्रात माघी गणेश जयंतीला घरात गणेशमूर्ती आणून तिची पूजा करण्याची पद्धत आहे. तुमच्या घरी देखील यंदा बाप्पा विराजमान होणार असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही खास आमंत्रण पत्रिका घेऊन आलो आहोत. या आमंत्रण पत्रिका तुम्ही आपल्या नातेवाईकांना, प्रियजणांना, आप्तेष्टांना पाठवून त्यांना आपल्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी बोलवू शकता.
माघी गणेश जयंती निमित्त आमंत्रण पत्रिका -
सालाबादाप्रमाणे यंदाही आमच्याकडे माघी गणेशोत्सवानिमित्त श्रींचं आगमन होणार आहे तरीही आपण 1 फेब्रुवारी 2025 दिवशी सहकुटुंब बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी घरी यावं ही विनंती.
वेळ- दुपारी: 12 वाजून 30 मिनिटं
आरतीची वेळ : संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटं
विनित -
श्री गणेशाय नम:
सालाबादा प्रमाणे यंदाही आमच्याकडे माघी गणपतीचं आगमन होणार आहे. या आनंदसोहळ्या प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आपतेष्टां सोबत आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर हजेरी लावावी.
आपले लाडके,
पत्ता:
माघी गणेश उत्सवामध्ये यंदाही आमच्या घरी दरवर्षी प्रमाणे गणरायाचं आगमन होणार आहे. तरी बाप्पाच्या दर्शनासाठी 1 फेब्रुवारीला घरी येऊन तीर्थ प्रसादाचा आस्वाद घ्यावा.
पत्ता:
ॐ श्री गणेशाय नम:॥
आमच्या घरी यंदा 1 फेब्रुवारी दिवशी गणरायाचं आगमन होणार आहे. या निमित्त होणार्या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन बाप्पांचे आशिर्वाद घेण्यासाठी आपणास श्री.... आणि सौ ... कडून आग्रहाचे निमंत्रण!
पत्ता -
तारीख -
वेळ -
llश्री गणेशाय नम:ll
सालाबादा प्रमाणे यंदाही आमच्याकडे माघी गणपतीचं आगमन होणार आहे. या आनंदसोहळ्या प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आपतेष्टां सोबत आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर यावे ही नम्र विनंती.
पत्ता:
वेळ
माघ शुक्ल पक्ष चतुर्थी म्हणजेच माघी श्री गणेश जयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी श्री गणेशजीचे तत्व इतर दिवसांच्या तुलनेत 1 हजार पट जास्त सक्रिय असते. श्री गणेशाचा जन्म चतुर्थी तिथीला झाला असल्याने, गणपतीची स्पंदने आणि चतुर्थी तिथीला पृथ्वीची स्पंदने सारखीच असतात. याचा अर्थ असा की कोणत्याही चतुर्थीला गणपतीची स्पंदने पृथ्वीवर जास्त प्रमाणात पोहोचू शकतात.