Kargil Vijay Diwas 2024 Messages 6 (PC - File Image)

Kargil Vijay Diwas 2024 Messages in Marathi: भारत आणि पाकिस्तान अनेकदा आंतरराष्ट्रीय मंचावर अनेक मुद्द्यांवर आमनेसामने येतात. पण एक वेळ अशी आली जेव्हा भारताच्या शूर सैनिकांनी कारगिलची उंच शिखरे पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केली. यासाठी देशाच्या वीरांनी आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. या युद्धात अनेक जवान शहीद झाले. मात्र, कारगिल युद्ध भारताने जिंकले. हे दिवस इतिहासाच्या पानांवर गौरवाचे दिवस आहेत.

भारतीय लष्कराचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे दरवर्षी 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas 2024) म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने देशातील हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले जाते. कारगिल विजय दिवसानिमित्त Wishes, Images, Messages द्वारा तुम्ही या युद्धात शहीद झालेल्यांना जवानांना सोशल मीडियाद्वारे अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.

कारगिल युध्दात शहिद

वीर जवानांना माझा प्रणाम…

देशासाठी केलेल्या तुमच्या

बलिदानाला शत शत सलाम…

Kargil Vijay Diwas 2024 Messages 1 (PC - File Image)

कारगिल विजय दिवस

आपल्या देशासाठी लढणाऱ्या

भारतीय वीर सशस्त्र दलाच्या

सर्व शूर सैनिकांना माझा सलाम

कारगिल विजय दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

Kargil Vijay Diwas 2024 Messages 2 (PC - File Image)

आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे

आज हा दिवस पाहिला…

ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी

जन्मलेल्या वीरामुळे हा देश अखंड राहिला…

कारगिल विजय दिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Kargil Vijay Diwas 2024 Messages 3 (PC - File Image)

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा

शहिदांच हृदयातील ज्वाला आठवा

ज्यांच्यामुळे आज कारगिलचे

स्वातंत्र्य कायम आहे…

देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…

ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे

कारगिल विजय दिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Kargil Vijay Diwas 2024 Messages 4 (PC - File Image)

शौर्य, पराक्रम आणि देशाच्या

शुर सैनिकांच्या बलिदानाचे प्रतिक

कारगिल विजय दिवस

मातृ भूमीच्या रक्षणासाठी आपल्या

प्राणाचे बलिदान दिलेल्या अमर

शहिदांना भावपूर्ण श्नध्दांजली

Kargil Vijay Diwas 2024 Messages 5 (PC - File Image)

1999 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यांमध्ये सीमावादावरून कारगिल युद्ध झाले. पाकिस्तानी सैन्याने भारतीय हद्दीतील कारगिलची उंच शिखरे काबीज केली होती. पण भारताच्या शूर जवानांनी पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावले. ऑपरेशन विजयमध्ये भारतीय लष्कराने टायगर हिल आणि इतर चौक्या ताब्यात घेतल्या. हे युद्ध आपल्या सैनिकांसाठी सोपे नव्हते. लडाखमधील कारगिल युद्ध पाकिस्तानी सैन्यासोबत 60 दिवसांपेक्षा जास्त काळ सुरू होते.