
Guru Purnima 2024 HD Images: आषाढ शुक्ल पौर्णिमेला गुरुपौर्णिमेचा (Guru Purnima 2024) सण साजरा केला जातो. यंदा आषाढ पौर्णिमा 20 जुलैपासून सुरू होऊन 21 जुलै रोजी संपणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, गुरु पौर्णिमेसाठी आवश्यक असलेली आषाढ शुक्ल पौर्णिमेची तारीख 20 जुलै रोजी संध्याकाळी 05:59 पासून सुरू होईल आणि 21 जुलै रोजी दुपारी 03:46 वाजता समाप्त होईल. ज्या दिवशी सूर्योदय होतो ती तारीख वैध आहे. आषाढ पौर्णिमा तिथीचा सूर्योदय 21 जुलै रोजी सकाळी 05:37 वाजता होईल. अशा परिस्थितीत गुरुपौर्णिमा रविवार, 21 जुलै रोजी साजरी होणार आहे.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षि वेदव्यासजींची पूजा केल्याने विशेष फल प्राप्त होते. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या पूजेचेही विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी चंद्राची पूजा केल्याने सर्व दोषांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. या दिवशी लोक त्यांच्या गुरूंच्या चरणांना स्पर्श करून कृतज्ञता व्यक्त करतात, त्यांना मिठाई आणि फुले अर्पण करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही तुमच्या आयुष्यातील गुरुजनांना खास मराठमोळ्या शुभेच्छा Wishes, Whatsapp Status, Greetings पाठवू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकतात.


Guru Purnima 2024 HD Images 4 (PC - File Image)


मान्यतेनुसार, भगवान वेद व्यास, ज्यांना हिंदू धर्माचे आदिगुरू मानले जाते त्यांचा जन्म गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाला होता. वेद व्यासांनी महाभारत, वेद आणि पुराणांसह अनेक महत्त्वपूर्ण धार्मिक ग्रंथांची रचना केली. या दिवशी भगवान बुद्धांनीही आपल्या पहिल्या पाच शिष्यांना उपदेश केला होता. या दिवशी अनेक ठिकाणी गुरुशिष्य परंपरेचे वर्णन करणारी नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. लोक या दिवशी दानधर्मही करतात.