
Happy Gudi Padwa 2025 Advance Wishes In Marathi: गुढीपाडवा (Gudi Padwa 2025) हा हिंदू चंद्र सौर कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. हा उत्सव या वर्षी 30 मार्च 2025 रोजी साजरा केला जाईल. गुढीपाडव्याच्या दिवशी दारात विजयाची गुढी उभारली जाते. या दिवशी सकाळी लवकर घरासमोर गुढी उभारून मराठी नवीन वर्षाचे (Marathi New Year 2025) स्वागत केले जाते.
गुढी पाडव्यानिमित्त लोक एकमेकांना मराठी नववर्षाच्याही शुभेच्छा देतात. तुम्ही गुढी पाडवा सणाच्या आधी आपल्या मित्र-परिवारास आगाऊ शुभेच्छा देऊ शकता. तुम्ही WhatsApp Status, Quotes, Messages द्वारा शेअर करत आपल्या प्रियजनांना खास मराठी नववर्षाच्या शुभेच्छा पाठवू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
Happy Gudi Padwa In Advance!

वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष
मराठी नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा
Happy Gudi Padwa In Advance!

नवी सकाळ, नवी उमेद,
नवे संकल्प, नवा आनंद..
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुडी पाडव्याच्या शुभेच्छा!
Happy Gudi Padwa In Advance!

चारी दिशांना आनंदाची आहे बहार..
गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद..
दारी सजली आहे रांगोळी..
आसमंतात आहे पतंगाची रांग..
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र,
चांदीचा तांब्या, कडुनिंबाची पानं,
साखरेची माळ, अशी उभारूया समृद्धीची गुढी. नववर्षाभिनंदन.
Happy Gudi Padwa In Advance

गुढीपाडवा हा हिंदू नववर्षातील पहिला सण आहे. महाराष्ट्रासोबतच गुढीपाडवा दाक्षिणात्य राज्यात आणि गोव्यातही उत्साहात साजरा केला जातो. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.