Ganpati Visarjan 2024 Quotes In Marathi: 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. 17 सप्टेंबरला अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जाईल. गणेशोत्सव हा 10 दिवस चालणार उत्सव आहे. हा उत्सव अनंत चतुर्दशीच्या दिवशी संमाप्त होईल. भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणरायाचा जन्म झाला होता. त्यामुळे या दिवशी गणेश जयंती साजरी करण्यात येते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाविक बाप्पाला मोठ्या थाटामाटात निरोप देतात आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करतात. बाप्पाच्या मूर्तीचे तलाव, नदी इत्यादी ठिकाणी विसर्जन केले जाते.
अनेक गणेशभक्त दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा 11 दिवसांसाठी गणपतीची प्रतिष्ठापना करतात. तुम्ही तीन दिवशीय गणपतीची प्रतिष्ठापना केली असेल तर आम्ही तुमच्यासाठी गणेश विसर्जन संदेश, गणेश विसर्जन कोट्स, गणेश विसर्जन प्रतिमा, गणेश विसर्जन व्हॉट्सॲप स्टेटस, गणपती विसर्जन मराठी कोट्स घेऊन आलो आहोत. तुम्ही हे कोट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्र-परिरासोबत शेअर करू शकता. (हेही वाचा - Ganesh Visarjan 2024 Dates: गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत 1.5, 3, 5, 7, 10 दिवसांच्या गणेश विसर्जनाच्या तारखा आणि शुभ मुहूर्त घ्या जाणून)
गणपती विसर्जन कोट्स, ईमेज, व्हॉट्सअॅप स्टेटस -
यावर्षी, गणेश विसर्जनाचा तिसरा दिवस सोमवार, 9 सप्टेंबर, 2024 रोजी होणार आहे. गणेश विसर्जन 2024 तिसऱ्या दिवशीचा मुहूर्त आणि शुभ वेळ सकाळी 06:25 ते 07:57, सकाळी 09:30 ते 11:03 पर्यंत आहेत. 10 सप्टेंबर रोजी 02:08 PM ते 06:46 PM, 06:46 PM ते 08:13 PM, 11:08 PM ते 12:35 AM पर्यंत असेल.