
Mahashivratri 2025 HD Images: सनातन धर्मात महाशिवरात्रीचे (Mahashivratri 2025) विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी महाशिवरात्रीला अनेक शुभ योगायोग घडत आहेत. हिंदू कॅलेंडरनुसार, महाशिवरात्रीचा उपवास फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला पाळला जातो.
यावर्षी महाशिवरात्री तिथी 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:8 वाजता सुरू झाली असून 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 वाजता संपेल. आज सर्वत्र महाशिवरात्री साजरी होत आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला पाण्याने अभिषेक केला जातो. याशिवाय, या दिवशी शिवभक्त एकमेकांना महाशिवरात्रीच्या देतात. तुम्हाला देखील तुमच्या मित्र-परिवाराला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी Mahashivratri HD Images, Messages आणि Wishes घेऊन आलो आहोत.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा -





महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूर्ण भक्तीने पूजा केली जाते. मान्यतेनुसार, महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला झाला होता. म्हणून दरवर्षी फाल्गुन महिन्यातील चतुर्दशी ही तारीख महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. या खास प्रसंगी देशभरातील शिव मंदिरांमध्ये महादेवाची विशेष पूजा केली जाते. तसेच महाभिषेक केला जातो.