
Ganga Jayanti 2025 HD Images: हिंदू धर्मात गंगेला आईचा आदर दिला जातो. गंगा स्नान केल्याने व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते असे मानले जाते. दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला गंगा सप्तमीचा उत्सव साजरा केला जातो. हिंदू धर्मात गंगा मातेच्या पूजेसाठी काही विशेष तारखा निश्चित केल्या आहेत, त्यापैकी गंगा सप्तमी आणि गंगा दशहरा हे दिवस प्रमुख आहेत. गंगा सप्तमी (Ganga Saptami 2025) च्या दिवशी गंगा जयंती (Ganga Jayanti 2025) साजरी केली जाते.
गंगा सप्तमी हा तो दिवस आहे जेव्हा मोक्ष देणारी आणि जीवन देणारी गंगा माता आपल्याला जीवन देण्यासाठी पृथ्वीवर आली. म्हणजेच गंगा सप्तमी हा दिवस गंगा मातेच्या पृथ्वीवर अवतरण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी दिवशी गंगा माता पृथ्वीवर आली. हिंदू धर्मात या दिवसाला खूप महत्व आहे. या दिवशी लोक गंगा सप्तमीच्या आणि गंगा जयंतीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील आपल्या मित्र-परिवारास खालील Messages, WhatsApp Status, Wishes द्वारे द्या गंगा सप्तमीच्या शुभेच्छा पाठवू शकता.
गंगा सप्तमीच्या मराठी शुभेच्छा!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
गंगा सप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा!

गंगेचे पवित्र पाणी तुमचे मन,
शरीर आणि आत्मा शुद्ध करो.
गंगा जयंतीच्या शुभेच्छा!

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
गंगा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

गंगा जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!

गंगा जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

गंगा सप्तमीच्या दिवशी गंगा मातेची पूजा केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी वाढते. वैदिक कॅलेंडरनुसार, गंगा सप्तमी 3 मे रोजी साजरी केली जाईल. या दिवशी, वैशाख शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी पहाटे 5:57 वाजता सुरू होईल. ही तारीख दुसऱ्या दिवशी, 4 मे रोजी सकाळी 5.22 वाजेपर्यंत राहील. उदय तिथीनुसार, गंगा सप्तमीचा उत्सव फक्त 3 मे रोजी साजरा केला जाईल.