Happy Holi 2025 HD Images (फोटो सौजन्य - File Image)

Happy Holi 2025 HD Images: आज म्हणजेचं 13 मार्च रोजी सर्वत्र होळीचा सण साजरा होत आहे. होळी (Holi 2025) च्या दिवशी होलिका दहन केले जाते. या दिवशी झाडाची छोटीशी डहाळी जमिनीवर ठेवली जाते आणि तिच्या सर्व बाजूंनी लाकूड, शेणाच्या गौऱ्या लावल्या जातात. यानंतर शुभ मुहूर्तावर ही होळी पेटवली जाते. असे मानले जाते की ही आग वर्षभर व्यक्तीला निरोगी ठेवण्यास मदत करते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करते.

होलिका दहनानंतर, राख घरी आणून त्याचा तिलक लावण्याची परंपरा आहे. बऱ्याच ठिकाणी याला छोटी होळी असेही म्हणतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी याच होळीची राख धुळीवंदनात रंग म्हणून देखील वापरली जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते. होळी सणानिमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवारास Happy Holi Messages, Holi Happy Greetings, Happy Holi Quotes, Holi WhatsApp Status पाठवून रंगाच्या सणाचा आनंद आणखी द्वगुणीत करू शकता.

आली होळी, आली होळी,नवरंगांची घेऊन खेळी

तारुण्याची अफाट उसळी, रंगी रंगू सर्वांनी

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Holi 2025 HD Images 1 (फोटो सौजन्य - File Image)

होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा

Happy Holi 2025 HD Images 2 (फोटो सौजन्य - File Image)

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Holi 2025 HD Images 3 (फोटो सौजन्य - File Image)

होळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Happy Holi 2025 HD Images 4 (फोटो सौजन्य - File Image)

सर्वांना होळीच्या मंगलमय शुभेच्छा!

Happy Holi 2025 HD Images 5 (फोटो सौजन्य - File Image)

देशाच्या प्रत्येक भागात होळीचा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. मध्य प्रदेशातील मालवा प्रदेशात, रंगपंचमी होळीच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. मथुरा आणि वृंदावनमध्येही होळी १५दिवस साजरी केली जाते. महाराष्ट्रात रंगपंचमीच्या दिवशी कोरड्या गुलालाने होळी खेळण्याची परंपरा आहे. तथापि, होळी हा दक्षिण गुजरातमधील आदिवासींसाठी सर्वात मोठा सण आहे.