Navratri 2020 Simple Mehndi Designs (Photo Credits: Instagram)

Simple And Easy Mehndi Design for Navratri 2020: अश्विन शुध्द प्रतिपदेपासून शरद ऋतुचे आगमन होते. त्यामुळे प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजर्‍या होणार्‍या देवीच्या या उत्सवास शारदीय नवरात्र म्हणतात. हा उत्सव 9 दिवस उत्सव चालतो, त्यामुळे यास 'नवरात्र' म्हटलं जातं. दहाव्या दिवशी या उत्सवाची समाप्ती होते. नवरात्रीच्या सणासाठी विशेषत: महिला वर्गाची चांगलीच धावपळ असते. अनेक स्त्रिया या उत्सव काळात 9 दिवसांचा उपवास करतात. तसेच 9 दिवस 9 वेगवेगळ्या रंगाच्या साड्या किंवा ड्रेस परिधान करतात. या उत्सवकाळात महिला साज-श्रृंगार करतात. यात हातावर मेहंदी काढण्याचीदेखील पद्धत आहे. मेहंदी काढल्याने महिलाच्या श्रृंगारात आणखी भर पडते. तसेच त्यांच्या हाताचं सौदर्यं आणखी उठून दिसतं.

नवरात्री निमित्त तुम्हीही हातावर मेहंदी काढण्याचा विचार करत असाल, तर खालील व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगात येतील. या व्हिडिओच्या साहाय्याने तुम्ही अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीने मेहंदी डिझाईन्स काढू शकता. (हेही वाचा - Navratri 2020 Calendar: घटस्थापना, खंडे नवमी ते दसरा यंदा नवरात्री मध्ये कोणत्या दिवशी? जाणून घ्या त्याचे पुजा विधी, महत्त्व)

पहा सोप्या आणि झटपट काढून होणाऱ्या मेहंदी डिझाईन -

वरील व्हिडिओज पाहून तुम्ही अगदी सोप्य पद्धतीने सुंदर मेहंदी काढ शकता. या मेहंदीमुळे तुमच्या हातांचं सौदर्यं नक्कीचं वाढेल. शनिवार म्हणजेच 17 ऑक्टोबर 2020 रोजी घटस्थापनेनंतर नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. नवरात्रीचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोरोना संकटामुळे यंदा नवरात्री उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरे करण्यात येणार आहे.