Navratri 2019: 'दुर्गे दुर्गट भारी' ते 'नवरात्रीला नवरूपे तू' नवरात्रीमध्ये देवीच्या विविध रूपांचा जागर करणार्‍या आरत्या, भक्तीगीते (Watch Video)
Navratri Shubhechha (Photo Credits: FIle Photo)

आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून सुरु होणारा नवरात्र (Navratri 2019)  उत्सव हा देवीरुपी स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचा सोहळा आहे. घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा केली जाते.  अलीकडे नवरात्री म्हणजे गरबा दांडिया हे समीकरण अधिक ऐकिवात असलं तरीही अनेक ठिकाणी या मागील संस्कृती जपण्याचे प्रामाणीक प्रयत्न केले जातात. घटस्थापना करून, पूजा अर्चना करून देवीला पुजले जाते. आता कोणतीही पूजा म्हंटली की ती आरती शिवाय पूर्ण होत नाहीच.प्रत्येक सणानुसार देवातांना संबोधून म्हण्टल्या जाणाऱ्या आरतीच्या यादीत नवरात्री विशेष देखील काही आरत्या आहेत.

यंदा 29 सप्टेंबर पासून ते 8 ऑक्टोबर पर्यंत पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी अंबामातेची महती सांगणाऱ्या काही खास आरत्या तुम्ही नक्की निवडू शकता...

नवरात्रीला नवरूपे तू

उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो

महिषासूर मर्दिनी स्तोत्र

दुर्गे दुर्गट भारी

याशिवाय नवरात्रीच्या निमित्ताने देवीच्या वेगवेगळ्या रूपांची महती सांगणाऱ्या देखील विविध आरत्या आहेत. रेणुका माता, महालक्ष्मी, सप्तश्रुंगी या व अन्य देवतांची महती गाणाऱ्या या काही खास आरत्या..

अनेक ठिकाणी गोंधळ व जोगव्याची गाणी गाण्याची देखील पद्धत आहे. याकरिता ही काही खास जोगव्याची गाणी सुद्धा तपासून पहा..

नवरात्र हा शक्तीच्या पूजनाचा सण आहे, सणात गरबा दांडियाची धमाल अनुभवताना मूळ उद्दिष्ट न विसरता अंबेमातेला स्मरणात ठेवा हीच सर्वात मोठी भक्ती असेल. लेटेस्टली मराठीच्या वतीने तुम्हाला या नवरात्रोत्सावाच्या खूप खूप शुभेच्छा!