
Kanya Pujan 2024 Date and Time: सध्या देशभर शारदीय नवरात्रीची (Navaratri) धूम आहे. हा सण स्त्री शक्तीचा जागर करण्याचा आहे. या शारदीय नवरात्री मध्ये अष्टमी आणि नवमी या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्याने या सणाचं सेलिब्रेशन अजूनच खास होणार आहे. नवरात्रीमध्ये अष्टमीचा दिवस खास असतो. या दिवशी होम हवन, खास उपवास करण्याची पद्धत आहे. तसेच या दिवसाच्या औचित्याने कन्या पूजन केले जाते. यंदा कन्या पूजन (Kanya Pujan) 11 ऑक्टोबर दिवशी केलं जाणार आहे. अष्टमी आणि नवमीची तिथी एकाच दिवशी आल्याने या काहींच्या मनात या दिवशी केलं जाणारं कन्यापूजन नेमकं कधी करावं याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
अष्टमी आणि नवमी तिथीची वेळ तारीख काय?
शारदीय नवरात्री मधील अष्टमी यावर्षी 10 ऑक्टोबरच्या दिवशी दुपारी 12.31 ला सुरू होणार आहे तर समाप्ती 11 ऑक्टोबरच्या दुपारी 12 वाजून 6 मिनिटांनी होणार आहे. महा नवमी 11 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजून 6 वाजता सुरू होणार असून समाप्ती 12 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजून 58 मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे कन्या पूजन 11 ऑक्टोबर दिवशी केले जाऊ शकते.
अष्टमी नवमी एकाच दिवशी येणं हा एक चांगला योग आहे. या दिवशी केली जाणारी पूजा अर्चना अधिक सकारात्मकता घेऊन येणारी आहे. प्रत्येक दिवशी देवीच्या शक्तीचं एक खास रूप पूजण्याची पद्धत असल्याने दोन तिथींचं एकत्र येणं दोन देवींच्या एकत्र आशिर्वादासारखा मानलं जाणार आहे.
कन्या पूजन कसं केलं जातं?
कन्या पूजनाच्या निमित्ताने घरी कुमारिकांना बोलावून त्यांच्यातील देवीचं रूप पूजनाची पद्धत आहे. या निमित्ताने घरी मुलींचे पाय धुतले जातात. त्यांना भेटवस्तू आणि शिरा-पुरीचा नैवेद्य दिला जातो. कन्या पूजनाच्या शुभेच्छा Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन देवीच्या रुपातील चिमुकलींचा करा सन्मान!
टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला असून यामधील कोणत्याही गोष्टीची पुष्टी लेटेस्टली मराठी करत नाही. अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही.