National Voters Day च्या निमित्ताने सुदर्शन पटनायक, नितीन गडकरींसह नेटकर्‍यांंनी शेअर केले खास ट्वीट्स!
National Voters Day 2021| Photo Credits: Twitter/ @sudarsansand

भारतीय लोकशाहीला बळकट करायचं असेल तर मतदाराने त्याचा मतदानाचा हक्क बजावणं आवश्यक आहे. दरम्यान भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी राष्ट्रीय मतदार दिन भारतामध्ये साजरा केला जातो. भारताने आपले संविधान स्वीकारण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 25 जानेवारी 1950 ला भारत निवडणूक आयोगाची स्थापना केली. याच दिवसाचं औचित्य साधत जनतेमध्ये मतदानाचा हक्क बजावण्याबद्दल जनजागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने 2011 पासून 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन (National Voters Day) सुरू केला आहे. यंदा 11 वा मतदार दिन साजरा केला जात आहे. पहा या दिवसाच्या निमित्ताने नेटकर्‍यांनी सोशल मीडीयात शेअर केलेले खास ट्वीट्स! नक्की वाचा: Digital Voter-ID Cards: आता मतदारांना मिळणार ऑनलाईन e-EPIC कार्ड; डाउनलोड करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या शुभेच्छा

प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी राष्ट्रीय मतदार दिन 2021 च्या निमित्ताने खास शिल्प आज ओडिशाच्या पुरी समुद्र किनारी खास चित्र रेखाटलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

आमदार धीरज देशमुख

खासदार अमोल कोल्हे

दरम्यान यंदा मतदार दिनाचं औचित्य साधत नागरिकांना आता डिजिटल माध्यमातून ओळखपत्र उपलब्ध करून देण्यासाठी सुविधा राबवली जात आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक भारतीयाला आपले नाव मतदार यादीत नोंदवून मतदान करण्याचा हक्क बजावण्यास अनुमती दिली जाते. नाव मतदार यादीत न नोंदविल्यामुळे अनेक मतदार मतदानाच्या हक्कापासून दूर राहतात. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. लोकशाही प्रबळ, मजबूत व भक्कम करण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे.