National Voters' Day 2019: भारतीयांना आपल्या 'मतदाना'च्या अधिकाराबाबत जागृत करणारा आजचा दिवस, 'राष्ट्रीय मतदाता दिवस' याचा नेमका उद्देश काय?
National Voters' Day 2019 | Image used for representational purpose | File Image

National Voters' Day 2019: 25 जानेवारी हा दिवस भारतामध्ये 'राष्ट्रीय मतदाता दिवस' (National Voters' Day) म्हणून ओळखला जातो. भारताचा नागरीक म्हणून आपल्या हक्कांबाबत आपण जसे जागृत असतो तसेच आपण आपल्या अधिकारांबाबतही जागृत असणं आवश्यक आहे. भारतीय नागरिकांना देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच मतदान करण्याचा अधिकार मिळाला तर काही महासत्तांमध्ये महिला नागरिकांनी लढा देऊन हा अधिकार मिळवला. त्यामुळे भारतामध्ये प्रत्येक नागरिकांना मतदानाचा आपला अधिकार बजावला पाहिजे. 2011 सालपासून 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदाता दिवस म्हणून साजरा करण्याची सुरूवात झाली. यंदा नववा National Voters' Day साजरा केला जात आहे. यामध्ये तरूणांना देशाची राजनीतिक प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहीत केले जाणार आहे.

26 जानेवारी 1950 या दिवशी आपण भारतीय संविधान स्वीकारलं. याद्वारा आपण लोकशाहीच्या माध्यमातून सरकार निवडतो. 26 जानेवारी 1950च्या एक दिवस आधी भारतामध्ये आपण इलेक्शन कमिशनची निवड केली. त्यामुळे देशात निवडणुकांमध्ये अधिकाधिक भारतीय लोकांनी मतदानाचा अधिकार वापरावा याकरिता 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदाता दिवस सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. Republic Day 2019: दहशतवादी ते लष्करी अधिकारी अशा प्रवासादरम्यान भारतासाठी बलिदान देणार्‍या नाझीर वाणी यांचा यंदा होणार मरणोत्तर अशोकचक्र देऊन गौरव

युवकांमध्ये जागरूकतेची गरज

भारतामध्ये 65% तरूण आहेत. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये देशातील युवकांचा भारताच्या बदलत्या राजकारणामध्ये मोलाचा वाटा आहे. राष्ट्राच्या हितासाठी युवकांचं योगदान आवश्यक आहे. याकरिता देशभरामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन केले जाते. 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीयाला मतदान करण्याचा अधिकार आहे.

राष्ट्रीय मतदाता दिवसाचा उद्देश काय?

राष्ट्रीय मतदाता दिवस हा समजामध्ये मतदानाच्या अधिकाराबद्दल जागृती वाढवण्याचं काम करतो. देशात लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे. त्यामुळे ही प्रत्येक सजग भारतीयाची जबाबदारी आहे हे ओळखून त्याचा योग्यवेळी वापर करणं आवश्यक आहे.

देशाचं भविष्य हे आजच्या तरूणपिढीमध्ये असतं. त्यामुळेच भारताला महासत्ता बनवायचे असेल आपल्याला आज तरूण पिढीला लोकशाही टिकवण्यासाठी सजग भारतीय नागरिक म्हणून आपला मतदानाचा हक्क किती महत्त्वाचा आहे? तो कसा वापरायचा याबद्दल जागृत राहणं आवश्यक आहे.