National Tourism Day 2022 (PC - File Image)

National Tourism Day 2022: भारत हा विविधतेचा देश आहे. भारतात अनेक पर्यटन स्थळे आहेत. जगभरातील पर्यटक भारतातील पर्यटन स्थळांना नेहमी भेट देत असतात. भारतातील पर्यटन स्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 25 डिसेंबर रोजी राष्ट्रीय पर्यटन दिवस (National Tourism Day 2022) साजरा केला जातो. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पर्यटनाचे महत्त्व कळावे यासाठी भारत सरकारने पर्यटन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. भारतीय पर्यटनामुळे करोडो लोकांना रोजगार मिळतो, तसेच देशाचा जीडीपीही वाढतो. याशिवाय पर्यटन दिनाच्या माध्यमातून भारताची ऐतिहासिकता, सौंदर्य, निसर्गसौंदर्य, संस्कृती देश-विदेशात पोहोचवली जाते.

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक पर्यटन स्थळे आहेत, जी पर्यटकांना आकर्षित करतात. ही आकर्षणे जगासमोर आणण्याचा पर्यटन दिन हा एक उत्तम मार्ग आहे. पण राष्ट्रीय पर्यटन दिवस कधी सुरू झाला हे तुम्हाला माहीत आहे का? पर्यटन दिन 2022 ची थीम काय आहे? राष्ट्रीय पर्यटन दिनाचा इतिहास आणि उद्देश काय आहे? हे या लेखातून जाणून घेऊयात... (वाचा - Republic Day 2022 Speech in Marathi: प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थी 'या' पद्धतीने करू शकतात भाषणाची तयारी; वाचा सविस्तर)

पर्यटन दिवस साजरा करायला कधी सुरुवात झाली?

जगभरात 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन साजरा केला जात असला तरी भारताचा पर्यटन दिवस 25 जानेवारीला आहे. या दिवसाची सुरुवात 1948 मध्ये झाली, जेव्हा देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन परिवहन समितीची स्थापना करण्यात आली. तीन वर्षांनंतर, म्हणजे 1951 मध्ये, कोलकाता आणि चेन्नई येथील पर्यटन दिनाच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये वाढ झाली. दिल्ली, मुंबई व्यतिरिक्त कोलकाता आणि चेन्नई येथे पर्यटन कार्यालये सुरू करण्यात आली. वर्ष 1998 मध्ये, पर्यटन आणि दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत पर्यटन विभाग जोडण्यात आला.

पर्यटन दिन साजरा करण्याचा उद्देश -

पर्यटनाचे महत्त्व आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील त्याची भूमिका याविषयी लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय पर्यटन दिनाची सुरुवात करण्यात आली. जागतिक समुदायांमध्ये पर्यटनाचे महत्त्व आणि त्याचे सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक मूल्य याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

पर्यटन दिनाचा भारताच्या जीडीपीवर खोल प्रभाव पडतो. वर्षभर जगभरातून लोक भारतातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी येतात, त्यामुळे भारताचा आर्थिक स्तर वाढतो. पर्यटन भारताच्या संस्कृतीचे आणि सभ्यतेचे प्रतिबिंबित करते, ज्याला परदेशात प्रोत्साहन दिले जाते. भारतातील सुमारे 7.7 टक्के लोक पर्यटनातून आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे रोजगार मिळतो.

राष्ट्रीय पर्यटन दिन 2022 ची थीम -

राष्ट्रीय पर्यटन दिन 2022 ची थीम "आझादी का अमृत महोत्सव" अशी आहे. 2021 च्या राष्ट्रीय पर्यटन दिनाची थीम ‘देखो अपना देश’ अशी होती.