National Mathematics Day (PC- Twitter)

गणित हा अनेकांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयामध्ये नापास होणाऱ्यांची संख्याही जास्त असते. गणित हा विषय अधिक सोप्या पद्धतीने शिकवल्यास मुलांना त्याची भीती वाटणार नाही. परंतु, अनेकदा गणित शिकवताना अतिशय क्लिष्ट पद्धतीचा वापर केला जातो. भारतामध्ये श्रीनिवास रामानुजन यांची जयंती 'राष्ट्रीय गणित दिवस' म्हणून दर वर्षी 22 डिसेंबर रोजी साजरी केली जाते. आज राष्ट्रीय गणित दिवसाचे औचित्य साधून आपण भारतात होऊन गेलेल्या काही महान गणित तज्ञांविषयी माहिती पाहणार आहोत.

श्रीनिवास रामानुजन -

श्रीनिवास रामानुजन अय्यंगार यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तामिळनाडू प्रांतातील इरोड या गावी झाला. त्यांचं नाव संत रामानुजा यांच्यावरुन ठेवण्यात आल होतं. त्यांचे वडील श्रीनिवास अय्यंगार एका कापडाच्या व्यापाऱ्याकडे नोकरी करत होते. त्या व्यवसायातील प्राप्ती अत्यंत तुटपुंजी असल्याने त्यांनी आपला मुक्काम कुंभकोणम या शहरात हलवला आणि एका व्यापार्‍याकडे मुनिमाची नोकरी करण्यास सुरुवात केली. वयाच्या पाचव्या वर्षी रामानुजन यांचे नाव कुंभकोणमच्या प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले. लहानपणापासूनच रामानुजन यांचे गणितावर प्रभुत्व होते. (हेही वाचा - 2020 Holiday Calendar: जाणून घ्या कधी आहेत सुट्ट्या आणि कसे करू शकता तुम्ही नवीन वर्षातील फिरण्याचे प्लॅन्स)

श्रीनिवास रामानुजन (PC- Twitter)

रामानुजन इंग्रजी विषयात नापास झाले तेव्हा त्यांनी शाळा सोडली. त्यानंतर ते गणित शिकले आणि त्यांनी आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली. रामानुजन यांनी गणितात 120 प्रमेय निर्माण केले. त्यासाठी केंब्रिज विद्यापीठाने त्यांना आमंत्रण दिलं. रामानुजन यांच्या गणिताबद्दलच्या योगदानामुळे त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. रामानुजन यांनी Analytical theory of numbers, Eliptical function आणि Infinite series या विषयांवर अभ्यास केला आहे.

आर्यभट्ट -

आर्यभट्ट (PC - Twitter)

भारताचे सर्वात पहिले गणितज्ज्ञ म्हणून आर्यभटट् यांना ओळखलं जातं. आर्यभट्ट यांनी पाचव्या शतकात पृथ्वी गोल आहे, हा सिद्धांत मांडला. आर्यभट्ट यांचा अंकगणित, बीजगणित व भूमिती या गणिताच्या शाखांचा त्याचा सखोल अभ्यास होता. वयाच्या तेविसाव्या वर्षीच त्याने बीजगणितावरचा आणि ज्योतिषावरचा ग्रंथ लिहिला. म्हणून आर्यभट्ट यास बीजगणिताचा जनक असे मानण्यात येते. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. आर्यभट्ट यांच्या कामगिरीमुळे भारताने आर्यभट्ट यांच्या नावाने पहिला उपग्रह आकाशात पाठवला होता.

शकुंतला देवी -

शकुंतला देवी (PC - Wikipedia)

शकुंतला देवी या भारतातल्या सर्वात प्रसिद्ध महिला गणितज्ञ मानल्या जातात. त्यांना मानवी कॉम्प्युटर असंही म्हटलं जातं. कारण शुकुंतला देवी कोणत्याही कॅल्क्युटरविना आकडेमोड करत असतं. त्यांचा जन्म इ. स. 1939 मध्ये झाला. शकुंतला यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्यांनी जगातल्या सगळ्यात वेगवान कॉम्प्युटरपेक्षाही वेगाने 50 व्या सेकंदाला 201 चं 23 वं वर्गमूळ काढलं होतं.

सी. एस. शेषाद्री -

सी. एस. शेषाद्री (PC - Wikipedia)

शेषाद्री यांनी अल्जेब्रीक जॉमिट्रीमध्ये बरेच योगदान दिले. मद्रास विद्यापीठात त्यांनी गणित विषय घेऊन पदवी घेतली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. केली. शेषाद्री कॉन्सटेंट आणि नराईशम-शेषाद्री कॉन्सटेंट हे त्यांचे संशोधन कार्य. 2009 मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ने सन्मानित करण्यात आले.

कल्यामपुड़ी राधाकृष्ण राव (सी आर राव) -

कल्यामपुड़ी राधाकृष्ण राव (PC-Wikipedia)

सी. आर. राव त्यांच्या Theory of Estimation साठी ओळखले जातात. कर्नाटकात जन्मलेले सी. आर. राव यांनी आंध्र विद्यापीठातून गणितात एम. ए. तर कोलकातामध्ये सांख्यिकी विषयात एम. ए. ची पदवी घेतली होती. राव यांनी एकूण 14 पुस्तकं लिहिली आहेत. त्यांचे 350 रिसर्च पेपर प्रकाशित झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांचा अनेक पुस्तकांचा युरोपीय, चीन, आणि जपानी भाषांत अनुवाद झाला आहे.