National Girl Child Day 2023 Wishes: राष्ट्रीय बालिका दिन शुभेच्छा देण्यासाठी खास Messages, Wishes, Greetings, HD Images, WhatsApp Stickers, इथून करा डाऊनलोड
Happy National Girl Child Day | File Photo

Happy National Girl Child Day 2023 Wishes in Marathi: बालिका दिन निमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. 24 जानेवारी 2008 रोजी बालिका दिन पहिल्यांदा साजरा करणयात आला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी 24 जानेवारी या दिवशी बालिका दिन साजरा केला जातो. दरम्यान, National Girl Child Day चं औचित्य साधत फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप यासारख्या सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर राष्ट्रीय बालिका दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा, संदेश, ग्रीटिंग़्स, व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस, HD Images, GIFs च्या माध्यमातून शेअर करून देशातील प्रत्येक चिमुरडीचा आजचा दिवस खास करायला मदत करू शकता.

बालिका दिन उद्देश

समाजात विविध स्तरांवर मुली आणि महिलांना भेडसावणाऱ्या असमानतेबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला. हा दिन साजरा करण्यासाठी भारत सरकार आणि महिला व बाल विकास मंत्रालयाने हाती घेतलेली संयुक्त मोहीम होती.

बालिका दिनाच्या शुभेच्छा!

Happy National Girl Child Day | File Photo

बालिका दिनाच्या शुभेच्छा!

Happy National Girl Child Day | File Photo

बालिका दिनाच्या शुभेच्छा!

Happy National Girl Child Day | File Photo

बालिका दिनाच्या शुभेच्छा!

Happy National Girl Child Day | File Photo

 

देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली. देशाने विविध क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली. तरीही समजामध्ये महिला आणि मुलींना असमानतेला तोंड द्यावे लागते. मुली आणि महिलांना भेडसावणाऱ्या भेदभाव, असमानता आणि शोषणाच्या समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे निर्मूलन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. (हेही वाचा, Tilkund Chaturthi Messages: तिलकुंद चतुर्थी निमित्त Wallpaper, WhatsApp Status, HD Images शेअर करत लाडक्या बाप्पाला करा वंदन)

बालिका दिनाच्या शुभेच्छा!

Happy National Girl Child Day | File Photo

बालिका दिन संकल्पना

बालिका दिनानिमित्त यंदा काही संकल्पना आणि उद्दीष्ट्येही ठेवण्यात आली आहेत. समाजाने मुलींच्या हक्कांबद्दल जागरूक असले पाहिजे आणि मुलींना त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी नवीन संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. बालिका दिनाव्यतिरिक्त, महिला व बाल विकास विभाग 24 ते 30 जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय बालिका सप्ताह साजरा करणार असून त्यामध्ये इतर महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यापैकी काहींमध्ये “बेटी बचाओ-बेटी पढाओ” स्वाक्षरी मोहीम, मुलींच्या नावाने वृक्षारोपण आणि नेमप्लेट मोहीम, महिलांच्या हक्कांबद्दल जनजागृती मोहीम आणि मुलींच्या संरक्षणासाठी सामूहिक शपथ यांचा समावेश आहे.