Tilkund Chaturthi 2023 Messages: तिलकुंद चतुर्थी निमित्त Wallpaper, WhatsApp Status, HD Images शेअर करत लाडक्या बाप्पाला करा वंदन

Tilkund Chaturthi Wishes in Marathi: दरवर्षी मकर संक्रांती नंतर येणाऱ्या विनायक चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात. यादिवशी लाडक्या गणरायाला तिळाचा प्रसाद अर्पण केल्या जातो म्हणून या चतुर्थीला विशेष महत्व आहे. गणरायाची मनोभावे पुजा करुन या दिवशी तिलकुंद चतुर्थीचं व्रत केल्यास भक्तांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. तरी यावर्षी २४ जानेवारीला तिलकुंद चतुर्थीचा मुहूर्त असुन योगायोगाने यादिवशी मंगळवार आहे. तरी गणेश भक्तांसाठी हा सर्वोत्तम योग आहे. हिंदू धर्मात तिलकुंद चतुर्थीला विशेष महत्व आहे. तरी तिलकुंद चतुर्थी निमित्त बाप्पाच्या भक्तांच्या मनात खास उत्सुकता असते. तुम्ही देखील गणपती बाप्पाचे भक्त असाल तसेच तुमचे नातेवाईक आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असल्यास आम्ही तुमच्यासाठी काही डिजीटल शुभेच्छा घेवून आलो आहोत. तरी तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस, फेसबूक पोस्ट, वॉलपेपर, इमेजेस शेअर करत तिलकुंद चतुर्थीच्या अनोख्या शुभेच्छा तुमच्या जवळच्या लोकांना देवू शकता.

 

1. स्नेहाचा सुगंध दरवळला

आनंदाचा सण आला

विनंती आमची गणेशाला

सौख्य समृध्दी लाभो तुम्हाला

तिलकुंद चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Tilkund Chaturthi
Tilkund Chaturthi

 

2.एक दंत दयावंत चार भुजाधारी
माथ्यावर टिळक शोभतो मुषकाची स्वारी

सर्व गणेश भक्तांना,तिलकुंद चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Tilkund Chaturthi
Tilkund Chaturthi

 

3.वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी सर्व गणेश भक्तांना!
तिलकुंद चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा!

Tilkund Chaturthi
Tilkund Chaturthi

 

4.तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,

सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,

हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…

”गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!

तिलकुंद चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Tilkund Chaturthi
Tilkund Chaturthi