
National Doctors’ Day 2022 Messages: जेव्हा एखादी व्यक्ती आजारी पडते तेव्हा ती डॉक्टरकडे जाते. कारण, डॉक्टर लोकांना केवळ लहानच नाही तर अनेक गंभीर आणि धोकादायक आजारांपासून वाचवतात. डॉक्टरांना देवासारखा दर्जा दिला जातो. रुग्णाच्या कठीण काळात डॉक्टर त्यांना बरे करून नवजीवन देण्याचे काम करतात. कोरोनाच्या काळात सर्वांनी डॉक्टरांचे महत्त्व ओळखले आहे. कोविड काळात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी रात्रंदिवस कसे काम केले हे जगाने पाहिले. दरवर्षी 1 जुलै रोजी डॉक्टरांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो.
डॉक्टर्स डे निमित्त Wishes, Greeting, Whatsapp Status, Images च्या माध्यमातून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना खास शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Maharashtra Krishi Din 2022: महाराष्ट्र कृषी दिन कधी आहे? हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या)
आपल्यावर आलेलं आरोग्यसंकट
देवदूत रूपी होऊन दूर सारणार्या
प्रत्येक आरोग्यकर्मीला सलाम
राष्ट्रीय डॉक्टर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

कोरोना संकटाशी अविरत झुंजणार्या
कोविड योद्धा 'डॉक्टरांना' धन्यवाद
डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा!

वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने
काम करणार्या प्रत्येकाला धन्यवाद!
हॅप्पी डॉक्टर्स डे!

करोना महामारीच्या या कठीण काळात
रुग्णसेवा करणाऱ्या सर्व मनुष्यरुपी देवांना
माझा कोटी कोटी प्रणाम.
सर्व डॉक्टरांना डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मी आज स्वास्थ्य आणि निरोगी आहे
मी आजारी असताना माझी काळजी आणि माझा इलाज
करणाऱ्या सर्व डॉक्टर्सना डॉक्टर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा !

भारताला प्राचीन काळापासून वैद्य परंपरा आहे. उदाहरणार्थ, चरक, धन्वंतरी, जीवक, सुश्रुत इ. ज्यामध्ये भारतात दरवर्षी 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे हा डॉ. बिधानचंद्र राय यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो.