National Doctors' Day (Photo Credits: Pixabay)

National Doctor’s Day 2019 Theme:  महाराष्ट्रात 1 जुलै हा दिवस 'महाराष्ट्र कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो, त्यासोबतच या दिवशी देशभरात National Doctor’s Day साजरा केला जातो. देशभरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्सना या दिवशी त्यांच्या सेवेप्रती आभार व्यक्त केले जातात. रूग़्णांसाठी देवानंतर असलेली महत्वाची व्यक्ती म्हणजे डॉक्टर असते. रूग्णांच्या सेवेसाठी अनेक मेडिकल व्यवसायातील लोकं 24 X 7 काम करत असतात. भारतामध्ये Dr. Bidhan Chandra Roy यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. Dr. Bidhan Chandra Roy हे पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते.

Theme for Doctor’s Day 2019:

मागील काही दिवसांमध्ये डॉक्टरांवरील हल्ले आणि त्यातून झालेल्या हिंसाचाराच्या बातम्यांनी सार्‍या देशामध्ये चर्चा रंगल्या होत्या. अनेक ठिकाणी डॉक्टरांवरील हल्ल्यांचा निषेध विविध स्तरावर करण्यात आला. त्यामुळे डॉक्टरांची सुरक्षितता आणि त्यांचे कामाचे तास हे लक्षात घेता इंडियन मेडिकल असोसिएशनने ‘Zero tolerance to violence against doctors and clinical establishment’ही यंदाची थीम जाहीर करण्यात आली आहे.

जगभरात विविध दिवशी डॉक्टर्स डे साजरा केला जातो. 1991 सालपासून भारतामध्ये 1 जुलै दिवशी डॉक्टर्स डे साजरा करण्यास सुरूवात झाली. डॉक्टरांची सेवा ही समाजातील महत्त्वाच्या सेवांपैकी एक आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यला पुरेसा सन्मान आणि तयंचा आदर राखणं गरजेचे आहे हे प्रत्येक नागरिकाने समजून घेणं गरजेचे आहे.