
श्रावण महिन्यातील पौर्णिमा नारळी पौर्णिमा (Narali Purnima) म्हणून साजरी केली जाते. यंदा नारळी पौर्णिमेचा सण 11 ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे. कोळी बांधवांसाठी नारळी पौर्णिमेचा दिवस थोडा जास्त स्पेशल असतो. म्हणूनच या दिवसाचं औचित्य साधत तुमच्या कोळी समाजातील मित्र मैत्रिणींसोबतच प्रियजनांना, नातेवाईकांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठी संदेश, Wishes, Images, Wallpapers, WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत राखी पौर्णिमेचा हा दिवस साजरा करू शकता.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून शांत होण्यासाठी आणि पुन्हा मच्छिमारीसाठी सुरूवात करण्यासाठी आशिर्वाद देण्याची प्रार्थना करत असतो. यासाठी सारा कोळी समाज नटून थटून समिद्र किनारी येतो, पूजा करतो. तर इतर घराघरांमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त नारळाचा वापर करून अनेक गोडा-धोडाचे पदार्थ बनवले जातात. मग असा हा आनंदाची उधळण करणारा सण साजरा करण्यासाठी ही मराठमोळी शुभेच्छापत्रं तुम्ही नक्की शेअर करू शकता. हे देखील नक्की वाचा: Raksha Bandhan Mehndi Design 2022: रक्षाबंधन निमित्त काढा मेहेंदीच्या हटके डिझाईन, तुमच्या सुंदर हाताचे सौंदर्या दिसेल आणखी खुलून, पाहा व्हिडीओ .
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा सण
तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येवो
हीच आमची कामना!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येते भरती,
दर्याराजा शांत होण्यासाठी बांधव प्रार्थना करती..
घराघरात आज नैवेद्याला नारळीभात,
सागराला सोन्याचा नारळ अर्पित करून मासेमारीला होते सुरुवात..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

सण आयलाय गो, आयलाय गो
नारली पुनवचा..
मनी आनंद मावना,
कोळ्यांच्या दुनियेचा..
नारळी पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा!

समस्त कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे..
कोळीबांधवांना सुखाचे दिस येऊ दे..
नारळी पौर्णिमेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!
नारळी पौर्णिमा दिवशी रक्षाबंधन, राखी पौर्णिमा देखील साजरी केली जाते. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्यांच्याकडून तिच्या रक्षणाचं वचन मागून घेते. बहीण-भावाच्या नात्याचा जिव्हाळा वाढवणारा हा सण देखील सर्वत्र हिंदू बांधव मोठ्या जल्लोषात साजरा करतात.