श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस हा नाग पंचमी (Nag Panchami) म्हणून साजरा केला जातो. यंदा हा नाग पंचमीचा सण 21 ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे. श्रावण मासातील पहिला श्रावणी सोमवार आणि त्यासोबत नागपंचमी असा हा योग जुळून आला आहे. शिव शंकराच्या गळ्यातही नाग देवता असल्याने भगवान शंकराचे आणि नागाचे ही खास नातं आहे. मग या श्रावणी सोमवारी नागपंचमी देखील साजरी करत हा दिवस अजून मंगलमय करण्यासाठी तुमच्या प्रियजणांना, नातेवाईकांना, मित्र मंडळींना या दिवसाच्या खास शुभेच्छा देत नागपंचमी थोडी स्पेशल साजरी करायला विसरू नका. यासाठी लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्रं, Messages, Wishes, Quotes तुम्ही शेअर करू शकता.
नागपंचमी हा नागदेवतेचं पूजन करण्याचा दिवस आहे. या दिवशी नागाची प्रतिकृती आणून तिचं पूजन केलं जाते. सोबत त्याला दूध, लाह्याचा प्रसाद अर्पण केला जातो. नागपंचमी हा श्रावण महिन्यातला पहिला सण असल्याने अनेक विवाहित स्त्रिया माहेरी एकत्र जमून तो साजरा करतात.
नागपंचमीच्या शुभेच्छा
नागपंचमी सणाच्या निमित्ताने मुली एकत्र फुगड्या, झिम्मा खेळतात. ग्रामीण भागात वारूळाची देखील पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये सण समारंभांद्वारा निसर्गाचे देखील भान ठेवण्याची शिकवण दिली जाते. नागपंचमी च्या माध्यमातून शेतकर्यांचा मित्र समजल्या जाणार्या नागदेवतेची पूजा करून श्रावणातील पहिला सण साजरा केला जातो.