श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागपंचमी (Nag Panchami 2020) साजरी केली जाते. यंदा नागपंचमी 2 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी नागांची पूजा करून दुधाचा अभिषेक केला जातो. या दिवशी शिवभक्त नागांची पूजा करतात, त्यांना दूध देतात आणि आशीर्वाद घेतात. भगवान शिवशंकरांनी त्यांच्या गळ्यात नाग धारण केला आहे, त्यामुळे या दिवशी नागासह भगवान शिवाची पूजा करावी. पौराणिक काळापासून नागांची देवाप्रमाणे पूजा केली जात आहे. नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. तसेच नागपंचमीच्या दिवशी केलेल्या पूजेने राहू-केतू आणि काल सर्प दोष यांच्या वाईट प्रभावापासून मुक्ती मिळते, असेही म्हटले जाते.
मनुष्याला त्रास देणाऱ्या प्राण्यांमध्ये नाग हा एक भयंकर प्राणी आहे. म्हणून वर्षातून एक दिवस त्याची पूजा केली, तर त्यापासून भय राहणार नाही, या कल्पनेने श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा प्रचलित झाली असावी. या दिवशी घरात नागाची मातीची प्रतिमा अथवा त्याच्या चित्राची पूजा करतात. काही ठिकाणी गारुडी खरे नाग घेऊन घरोघरी हिंडतात, अशावेळी लोक नागाला दूध, लाह्या इ. पदार्थ वाहून त्याची पूजा करतात.
यंदाच्या नागपंचमीला खास Wishes, Messages, WhatsApp Status, HD Images च्या माध्यमातून तुम्ही या श्रावणातल्या पहिल्या सणाच्या शुभेच्छा देऊ शकता.
दरम्यान, कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते. (हेही वाचा: मंगळागौरी निमित्त Quotes, Whats App Status च्या माध्यमातून मित्रमैत्रिणींना द्या खास शुभेच्छा)
नागपंचमीच्या दिवशी काही भागातील स्त्रिया आपल्या भावाला चांगले व आरोग्यदायी आयुष्य लाभावे यासाठी उपवासही करतात. नागपंचमीच्या दिवशी चिरणे, कापणे, टाळणे, जमीन खणणे, नगर चालवणे अशा क्रिया वर्ज्य केल्या जातात. महाराष्ट्रातील सांगली जिल्हातील बत्तीस शिराळा तालुक्यातील नागपंचमीचा उत्सव विशेष लोकप्रिय आहे.