Mangala Gauri Vrat Wishes in Marathi: नुकताचं श्रावण मासारंभ (Shravan Month) झाला आहे. आज श्रावण महिन्याचा पहिला श्रावणी सोमवार (Shravani Somvar) आहे. श्रावण महिन्याला हिंदू (Hindu) संस्कृतीत विशेष महत्व आहे. सौभ्यागाचा महिना अशी देखील या महिन्याची ओळख आहे. या महिन्यातील दर सोमवारी भगवान शंकराची पूजा केली जाते. तर दर मंळवारी मंगळागौरी (Mangalagaur) चे व्रत करून आनंद साजरा केला जातो. नवविवाहित महिला लग्नानंतर 5 वर्ष हे व्रत करतात. या दिवशी देवी पार्वतीची पुजा करतात. अखंड सौभाग्य व सासर-माहेरास सुखसमृद्धी लाभावी यासाठी रात्रभर जागून हे व्रत करतात. या व्रताच्या पूजेसाठी शेजाऱ्यांना (Neighbours), मैत्रिणींना (Frineds), नातेवाईकांना (Relatives) विशेष आमंत्रण (Invitation) दिल्या जाते आणि एकमोकांना मंगळागौरीच्या शुभेच्छा देत हा सण साजरा करण्यात येतो.

 

पण सध्याच्या या डिजीटल (Digital) युगात एकमेकांना दर श्रावणी मंगळवारी भेटणं किंवा शुभेच्छा देण शक्य होत नाही. म्हणून हल्ली विविध सणांप्रमाणे मंगळागौरीच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना डिजीटल स्वरुपात देवू शकता. हल्ली व्हॉट्स अप (Wahts App), फेसबूक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) सारख्या सोशल मिडीयाच्या (Social Media) माध्यमातून एकमेकांना डिजीटल शुभेच्छा पाठवणं सह शक्य झालं आहे. तरी आम्ही तुमच्यासाठी मंगळागौरीच्या सणानिमित्त काही खास शुभेच्छा घेवू आलो आहोत. त्या तुम्ही तुमच्या व्हॉट्स अप स्टेटस, स्टोरी (Story), मेसेजेस (Messages), पोस्टच्या (Post) माध्यमातून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यत पोचवू शकता. (हे ही वाचा:- Shravani Somvar 2022 Wishes: श्रावणी सोमवार च्या शुभेछा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरं करा मंगलपर्व)

 

मंगळागौरीच्या मराठमोळ्या शुभेच्छा:-

सोनपावलांनी गौरी आली घरी

मनोभावे करूयात तिचे पूजन

सणासाठी लॉकडाऊन मोडणार नाही

असं नक्की द्या मला वचन

मंगळागौरी व्रताच्या सर्व सख्यांना शुभेच्छा

 

 

श्रावणामुळे पसरली हिरवळ

सुंदर दिसे निसर्गाची किमया

मंगळागौरच खेळायची ना

मग ऑनलाईन जमुयात सर्व सया.

मंगळागौरी व्रताच्या सर्व सख्यांना शुभेच्छा

 

 

 

झिम्मा फुगडी चा खेळ डिजिटली खेळू

सोशल डिस्टंसिंग पाळू आणि कोरोनाला टाळू

मंगळागौरी व्रताच्या खूप शुभेच्छा

 

 

पावसाच्या रिमझिम सरींनी

चहूकडे दरवळला मातीचा सुवास

यंदा ऑनलाईन शुभेच्छा देऊन

साजरी करूयात मंगळागौर खास

मैत्रिणींनो, मंगळागौरीच्या खूप खूप शुभेच्छा

 

श्रावण मासी साधला ऊन पावसाचा सुंदर मेळ

यंदा सोशल डिस्टंसिंग पाळून खेळूया मंगळागौरीचे खेळ

पहिल्या मंगळागौर व्रताच्या सर्वांना शुभेच्छा