Mumbai Holi Parties: मुंबईमध्ये अनेक ठिकाणी होळी पार्ट्यांचे आयोजन; जाणून घ्या ठिकाणे आणि वेळ
Representational Image |(Photo Credits- Twitter)

सध्या देशभरात होळी (Holi 2022) आणि रंगपंचमीची धामधूम सुरु आहे. कोरोना विषाणू रुग्णांमध्ये घट झाल्याने अनेक ठिकाणी मोठ्या धामधुमीत होळी खेळली जाणार आहे. वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक असलेला रंगांचा हा सण भारताच्या अनेक भागांत शुक्रवार, 18 मार्च 2022 रोजी साजरा केला जाईल. अनेक ठिकाणी मोठ-मोठ्या होळी पार्टीचे आयोजन केले जात आहे. यावेळी तरुणाई एकत्र येऊन आपापल्या परीने हा उत्सव साजरा करते. जर तुम्ही मुंबईमध्ये असाल तर अशा अनेक पार्ट्यांमध्ये सहभागी होऊ शकता.

महाराष्ट्र सरकारने बुधवारी होळी आणि धुलिवंदन साजरे करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, होळी खेळताना हे नियम पाळणे बंधनकारक आहे.

मुंबईमधील होळी पार्टीज-

बोरा बोरा होली बॅश 2022 (BORA BORA HOLI BASH 2022-Juhu) -

बोरा बोरा येथे मुंबईमधील एक मोठी होळी पार्टी होते. यावेळी तुम्ही संगीत, नृत्य आणि मनोरंजनाचा परिपूर्ण आनंद घेऊ शकाल. याआधी अनेक सेलेब्जनेही या पार्टीला हजेरी लावली आहे.

पत्ता: जुहू बीच समोर रमाडा प्लाझा. जुहू तारा रोड, मुंबई.

पॅकेज: कपल- 4000 रुपये, पुरुष स्टॅग- 3000 रुपये, महिला स्टॅग- 2000 रुपये

रंग बरसे होळी वीकेंड (Rang Barse Holi Weekend)-

मुंबईमधील सर्वात लोकप्रिय होळी पार्ट्यांपैकी ही एक आहे. या पार्टीमध्ये लाइव्ह डीजे कॉन्सर्ट, थंडाई, अमर्यादित ऑरगॅनिक कलर्स, हाय टी, बुफे लंच (व्हेज आणि नॉन-व्हेज), स्विमिंग पूल, रेन डान्स (इनसाइड रिसॉर्ट) अशा गोष्टी समाविष्ट आहेत.

तारीख आणि वेळ- 18 मार्च 2022 सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00

पत्ता- एसपी रिसॉर्ट पोयंजे पनवेल, पालेबुद्रुक जवळ दानफाटा, पनवेल, पोयंजे.

कलर स्प्लॅश (Colour Splash)-

मुंबईमधील ही पार्टीसुद्धा अतिशय लोकप्रिय आहे. या पार्टीमध्ये 8 सेलिब्रिटी डीजे, ढोल धमाका, रेन डान्स, बेव्हरेज काउंटर, ऑरगॅनिक गुलाल, कलर जेट ब्लोअर गन, थंडाई अशा गोष्टी समाविष्ट आहेत.

पत्ता- कंट्री क्लब, प्रथमेश कॉम्प्लेक्स, वीरदेसाई रोड, किया पार्क इमारतीसमोर, अंधेरी पश्चिम

वेळ: 3:30 - 10:00 वा

एपी होली फेस्ट 2022 (AP HOLI FEST 2022)-

मुंबईच्या बांद्रा परिसरातील ही एक लोकप्रिय होळी पार्टी आहे. संगीत, नृत्य आणि मनोरंजनाचा परिपूर्ण आनंद तुम्ही या ठिकाणी घेऊ शकाल.

पत्ता- 3 रा मजला, लिंक स्क्वेअर मॉल, लिंकिंग रोड, KFC समोर, वांद्रे पश्चिम.

वेळ- दुपारी 12 वाजल्यापासून

रंगलीला 2022 (Rangleela 2022)-

मुंबईपासून अवघ्या 1 तासाच्या अंतरावर असलेल्या भिवंडी येथे या पार्टीचे आयोजन केले आहे. डीजे, रेनसंड, ड्राय रंग, फूड, फोटोबूथ अशा अनेक गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत.

वेळ- 18 मार्च, सकाळी 9 वाजल्यापासून