Mother's Day 2022 Google Doodle: मदर्स डे निमित्त गूगलने शेअर केलं हृद्यस्पर्शी डूडल
Google Doodle | Google Homepage

भारतासह जगभरात आज (8 मे) आज मदर्स डे (Mother's Day) साजरा केला जात आहे. या दिवसाचं औचित्य साधत गूगनेही (Google) खास गूगल डूडल (Google Doodle) लॉन्च केले आहे. जगातील सार्‍या आईपण जपणार्‍या महिलांसाठी आजचं खास गूगल डूडल समर्पित करण्यात आलं आहे. आई आणि मुलाचं जिव्हाळ्याचं नातं गूगल डूडल मध्ये अधोरेखित करताना एक छुपा संदेश देखील आहे. नक्की वाचा: Mother's Day Gift Ideas 2022:डिनर डेटपासून ते एकत्र टॅटू काढण्यापर्यंत, साजरे करा हटके मदर्स डे.

GIF मध्ये बदलणार्‍या आजच्या गूगल डूडलमध्ये आई मूलाला शिक्षणाचे, पाणी जपून वापरण्याचे आणि वृक्षलागवडीचे संदेश देत असल्याचे पहायला मिळाले आहे. यामधून आई-मुलाचे गोड नातं पहायला मिळत आहे. Happy Mother's Day 2022 Wishes: मदर्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी Facebook Messages, WhatsApp Status शेअर करत व्यक्त करा कृतज्ञता! 

मदर्स डे 2022 च्या शुभेच्छा

1908 मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती वुड्रो विल्सन यांनी एक कायदा बनवला, ज्या अंतर्गत दरवर्षी मे महिन्याच्या दुस-या रविवारी 'मदर्स डे' साजरा केला जातो. मदर्स डे हा अमेरिकेमध्ये Honoured National Holiday म्हणून असतो. पण सर्वत्र पब्लिक हॉलिडे नसतो. प्रत्येक देशामध्ये मदर्स डे साजरा करण्याची तारीख वेगवेगळी आहे. पण मे महिन्यातील दुसरा रविवार हा मदर्स डे जगात 50 देशांमध्ये साजरा केला जातो. भारतामध्ये आजच्या दिवशी जसा मदर्स डे साजरा केला जाईल तसाच श्रावण महिन्यातील अमावस्येलाही मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे.