Mothers Day 2021 Marathi Quotes: मातृदिनानिमित्त Images, HD Wallpaper, Messages, Wishes द्वारे शेअर करा आईची महती सांगणारे प्रसिद्ध कोट्स
Happy Mother’s Day 2021 (Photo Credits: File Image)

Mother's Day 20211 Marathi Quotes: ‘आई’ या दोन शब्दांमध्ये जणूकाही एखाद्याचे संपूर्ण विश्व सामावले आहे. प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी कष्ट घेत असते, त्याग-तडजोड करत असते. आपण कितीही म्हटले तरी आईचे आपल्यावरील ऋण आपण फेडू शकत नाही. मात्र आईने जे-जे काही आपल्यासाठी केले आहे त्याबाबत आपली कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आईची महती गाणारा हाच दिवस जगभरात ‘मदर्स डे’ म्हणजेच ‘मातृदिन’ (Mother's Day 2021) म्हणून साजरा करतात. मे महिन्याच्या दुसरा रविवार हा मातृदिन म्हणून साजरा केला जातो. यंदा 9 मे रोजी मातृदिन साजरा केला जाईल.

आधुनिक काळात हा दिवस साजरा करण्याची सुरुवात अमेरिकेमधून झाली. तिथे  एना जार्विस नावाच्या मुलीने आईचे स्मारक बांधून श्रद्धांजली वाहिली होती. पुढे इतरांनीही तिचे अनुकरण करायला सुरुवात केली. त्यानंतर अनेकांनी हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस घोषित करावा अशी मागणी केली होती.

सुरुवातील ही विनंती नाकारली गेली मात्र, अमेरिकेचे माजी अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी 8 मे 1914 रोजी या दिवसाला अधिकृत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दर मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिवस साजरा करण्याची घोषण केली. तर अशाप्रकारे काही मातृदिनानिमित्त Images, HD Wallpaper, WhatsApp, Facebook Status, Messages, Wishes द्वारे काही प्रसिद्ध कोट्स शेअर करून व्यक्त करा आईबाबतची कृतज्ञता

'लेकराची माय असते, वासराची गाय असते,

दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते,

धरणीची ठाय असते, आई असते जन्माची शिदोरी,

सरतही नाही उरतही नाही'

- फ. मु. शिंदे

मातृदिनाच्या शुभेच्छा!

Mother's Day 2021

'दिला जन्म तू विश्व हे दाविलेस

किती कष्ट माये सुखे साहिलेस,

जिण्यालागी आकार माझ्या दिलास,

तुझ्या वंदितो माउली पाऊलांस'

- ग. दि. माडगूळकर

मातृदिनाच्या शुभेच्छा!

Mother's Day 2021

‘आई माझा गुरू, आई माझे कल्पतरू, आईचे प्रेम आकाशाहून मोठे आणि सागराहूनही खोल आहे'

- साने गुरूजी

मातृदिनाच्या शुभेच्छा!

Mother's Day 2021

‘ठेच कान्हूला लागली, यशोदेच्या डोळा पाणी

राम ठुमकत चाले, कौसल्येच्या गळा पाणी,

देव झाला तान्हुला ग, कुशीत तू घ्याया,

तिथे आहेस तू आई, जिथे आहे माया'

- मंगेश पाडगावकर

मातृदिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

Mother's Day 2021

'मला माझ्या आईची प्रार्थना आठवते, जी नेहमीच माझ्यामागे आहे. जणू काही ती माझ्या आयुष्याला चिकटलेली आहे'

- अब्राहीम लिंकन

मातृदिनाच्या मनापासून शुभेच्छा!

Mother's Day 2021

दरम्यान, मातृ दिनाचा इतिहास शतकांपूर्वीचा आणि प्राचीन आहे. हा दिवस ग्रीसमध्ये वसंत ऋतूच्या आगमनानंतर देवाच्या आईचा सन्मान करण्यासाठी साजरा करण्यात येत असे. सोळाव्या शतकात इंग्लंडच्या ख्रिश्चन समुदायाने मदर मेरी ऑफ जिझसचा सन्मान करण्यासाठी हा सण साजरा करण्यास सुरवात केली. 'मदर्स डे' साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे सर्व मातांचा सन्मान करणे हा होय.