Mokshada Ekadashi 2018 / Gita Jayanti 2018 हिंदू धर्मियांचा पवित्र ग्रंथ म्हणजे 'भगवतगीता' (Bhagavad Gita) ! मार्गशीर्ष शुक्ल एकादशीच्या दिवशी कुरूक्षेत्राच्या मैदानावर भगवान श्रीकृष्णाने ( Bhagvan Sri Krishna) गीता सांगण्यास सुरूवात केली. यंदा 18 डिसेंबर 2018 म्हणजे आजच्या दिवशी मार्गशीर्ष शुक्ल एकादशी दिवशी गीतेची सुरूवात झाल्याने हा दिवस 'गीता जयंती' (Gita Jayanti) म्हणून साजरा केला जातो. गीता जयंती दिवशी भगवतगीतेचे पठण केले जाते. सोबतच कृष्ण आणि गीता यांची पूजा केली जाते. Margashirsha Mahalakshmi Vrat : जाणून घ्या कसे करावे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत, पूजेची मांडणी आणि विधी
भगवत गीता म्हणजे काय ?
भगवत गीतेमध्ये 18 अध्याय व 700 श्लोक आहेत. भगवद्गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश लिहिलेला आहे. आजही गीतेमध्ये कृष्णाने अर्जुनाला केलेले उपदेश आपल्या अनेक समस्यांना उत्तरं मिळवून देण्यास मदत करतात. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी दिवशी गीता जयंती (Gita Jayanti) साजरी केली जाते त्याचप्रमाणे हा दिवस मोक्षदा एकादशी (Mokshada Ekadashi) म्हणूनदेखील ओळखला जातो.
मोक्षदा एकादशी , गीता जयंती मुहूर्त वेळ
18 डिसेंबरच्या सकाळी 7 वाजून 58 मिनटांनी एकादशी सुरू होते. 19 डिसेंबरला सकाळी 7 वाजून 35 मिनिटांपर्यंत मोक्षदा एकादशी साजरी केली जाऊ शकते.
मार्गशीर्ष शुक्ल एकादशी ही मोहाचा क्षय करणारी आहे. यामुळे या दिवसाला मोक्षदा एकादशी असेदेखील म्हटले जाते. या दिवसापासून मानवाच्या जीवनाला नवी दिशा देणार्या गीतेचा उपदेश सुरू झाला होता. त्यामुळे मानवी जीवनाला सत्कारणी लावण्यासाठी भगवतगीतेचे पाठ वाचले जातात.