Happy Christmas 2019 Messages: ख्रिसमस शुभेच्छा संदेश, मराठी ग्रीटिंग्स, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन द्विगुणित करा नाताळ सणाचा आनंद!
Christmas Marathi Messages (Photo Credits: File Photo)

Merry Christmas 2019 Marathi Messages and Wishes :   ख्रिसमस हा सण उत्साहाचा, चैतन्याचा आहे. येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून जगभरातील ख्रिस्ती बांधव 25 डिसेंबरला ख्रिसमस (Christmas) म्हणजेच नाताळचा सण साजरा करतात. मग या सेलिब्रेशनचा आनंद तुमच्या जवळच्या व्यक्तीसोंबत ख्रिसमच्या शुभेच्छा (Merry Christmas Messages) देऊन द्विगुणित करा. ख्रिसमस पाठोपाठ येणार्‍या नववर्षाच्या स्वागतासाठीदेखील जंगी तयारी सुरू असते त्यामुळे आपोआपच तुमच्या आसपासच्या वातावरणात चैतन्य असते. या सणाचं औचित्य साधून अनेकजण फेसबूक मेसेंजर, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस द्वारा ख्रिसमसच्या शुभेच्छा, नाताळच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी खास ग्रीटिंग्स, HD Images शेअर करुन हा दिवस खास बनवतात. मग ख्रिसमसच्या शुभेच्छा तुम्हांला मित्र परिवारासोबत, मित्रमैत्रिणींना देण्यासाठी ही मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, SMS, मेसेजेस नक्की शेअर करा आणि तुमचा आनंद द्विगुणित करा. Christmas 2019: नाताळ सण साजरा करण्यामागची 'ही' कथा तुम्हाला माहित आहे का?

24 तारखेच्या मध्यरात्री ख्रिश्चन धर्मिय चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात, त्यानंतर दुसर्‍या दिवशी गिफ्ट्स, ग्रिटिंग, गोडाचे खास पदार्थ देऊन एकमेकांना नाताळच्या म्हणजेच ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्याची प्रथा आहे.  Christmas 2019 Greeting Cards: नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी 5 सोपी DIY Xmas कार्ड्स बनवून खास करा ख्रिसमसचा सण!

ख्रिसमसच्या मराठमोळ्या शुभेच्छा

Christmas Marathi Messages (Photo Credits: File Photo)

आयुष्यात तुझ्या ख्रिसमसची रात्र

सुख समृद्धी घेऊन येवो

आनंद नेहमीच द्विगुणित होवो

ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!

Christmas Marathi Messages (Photo Credits: File Photo)

नाताळ सण घेऊन आला  आनंद मनात

मागूया सार्‍या चुकांची माफी मनात

सर्वांना सुखी कर ही कामना उरात

मदत हाच धर्म गाणे गावे सुरात

नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

via GIPHY

Christmas Marathi Messages (Photo Credits: File Photo)

सारे रोजचेच तरी भासो रोज नवा सहवास

सोन्यासारखा लोकांसाठी आजचा दिवस हा खास

मेरी ख्रिसमस!

via GIPHY

Christmas Marathi Messages (Photo Credits: File Photo)

सांताक्लॉज घेऊन आला शुभेच्छा हजार,

सोबत गिफ्ट्सची बरसात आणि आनंदाची बहार

मोठ्या उत्साहात जावो तुमचा हा आनंदाचा सणवार!

ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा

via GIPHY

Christmas WhatsApp stickers

आजकाल ग्रीटिंग्सप्रमाणेच व्हॉट्सअ‍ॅप या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपवर WhatsApp stickers च्या माध्यमातूनदेखील ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या जाऊ शकतात. सणांनुसार खास आकर्षक व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स उपलब्ध असतात. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Christmas 2019 असं टाईप केल्यास तुम्हांला अनेक पर्याय उपलब्ध असतील. आता अनेक सणांच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स उपल्बध आहेत.

भारतामध्येही ख्रिसमसचा खास उत्साह असतो. मुंबईतील वांद्रे, वसई परिसरात ख्रिस्ती बांधवांची वस्ती आहे. येथे सारे ख्रिस्ती बांधव एकत्र येऊन आनंदाने ख्रिसमसचा सण सेलिब्रेट करतात. मग तुम्ही हा सण कसा साजरा करणार आहात हे आमच्यासोबतची शेअर करा.