नाताळचा (Christmas) सण हा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याची तयारी देशा-परदेशात मोठ्या उत्साहात सुरू आहे. नववर्षाच्या उत्साहासोबतच नाताळच्या सणामध्ये आकर्षक रोषणाई, सॅंटाक्लॉज, गिफ्ट्स, प्लम केक यांची चंगळ असते. यासोबतच आता सिक्रेट सॅन्टा गिफ्ट्सचंदेखील आकर्षण आहे. या सणामध्ये आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी एखादी वस्तू सरप्राईज स्वरूपात देण्याची पद्धत आहे. मग या गिफ्टसोबत यंदा नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी खास ग्रिटिंग्स देणार असाल तर यंदा बाजारात विकत घेण्यऐवजी ती घरच्याघरी बनवू शकता. Secret Santa Gift Ideas For Girls: तुम्हीही होऊ शकता सिक्रेट सांता; 500 रुपये पर्यंतच्या 'या' वस्तू ठरतील बेस्ट गिफ्ट.
नाताळची ग्रीटिंग्स तुम्ही स्वतः बनवून त्याला पर्सनलाईज्ड टच देऊ शकता. मग यंदा 25 डिसेंबरपूर्वी तुमच्या आयुष्यातील यंदाचा हा सण खास करण्यासाठी पहा घरच्या घरी सहजसोपी नाताळची ग्रीटिंग्स कशी बनवाल? नाताळ म्ह्टला की लाल, पांढरा आणि हिरव्या रंगाचं विशेष आकर्षण असतं. मग त्यासाठी पहा कोणते पर्याय आहेत.
-
हॅन्डमेड ख्रिसमस ट्री ग्रिटिंग कार्ड
लहान मुलांना खूष करण्यासाठी अशाप्रकारची ग्रीटिंग्स हा मस्त पर्याय आहे. याकरिता केवळ काही बीड्स आणि कार्डपेपर,स्टार्स, रिबन लागेल.
2. सॅन्टा सूट कार्ड्स
सॅन्टा आणि नाताळ हे एक जणू समीकरणचं आहे. आबालवृद्धांना सॅन्टाक्लॉजशिवाज नाताळ हा सण अपुर्णच वाटतो.
3. पॉप अप ख्रिस्मस कार्ड्स
नाताळच्या सणाच्या सेलिब्रेशनमध्ये तुमची क्रिएटीव्हीटी थोडी अधिक वापरायची असेल तर थ्रीडी ख्रिस्मस ट्री हा एक उत्तम पर्याय आहे. याकरिता थोडे जास्त कष्ट घ्यावे लागतात.
4. ख्रिसमस कार्ड्स
ख्रिसमस सणाला थोडं स्पेशल करायचं असेल तर ख्रिस्मस स्पेशल ग्रीटिंग्ससोबत तुम्ही या ग्रिटींग्ससोबत चॉकलेट, बुफे, काही फुलं देऊ शकता.
5. बीड्स सोबतच बनवलेली ग्रीटिंग्स
क्रिएटीव्हीटी ही एक अशी गोष्ट आहे, ज्याला सीमा नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये बदल करू शकता.
ख्रिस्मसचा सण हा उत्साहाचा, आनंदाचा असतो. त्यामध्ये सहभागी होऊन तुमच्या जवळच्या लोकांचा आयुष्यात काही क्षण खास बनवा. सॅन्टाक्लॉजच्या रूपात त्यांच्या आयुष्यात आनंद पसरवा. मग त्यासाठी ग्रीटिंग्स हा एक मस्त पर्याय आहे.