डिसेंबर (December) महिना उजाडला की आपोआपच सगळीकडे उत्साह पाहायला मिळतो. या महिन्यात येणारा मुख्य सण म्हणजे नाताळ (Christmas), या सणाच्या निमित्ताने अनेक ऑफिस, कॉलेज मधील मित्र मैत्रिणी एक खास इव्हेंट आवर्जून करतात आणि तो म्हणजे सिक्रेट सांता (Secret Santa). चिट्ठ्या टाकून ज्याचं नाव येईल त्याला न सांगता गिफ्ट देण्याचा हा गेम मागील काही वर्षात तर भारीच हिट ठरला आहे. खरंतर हा गेम जितका रंजक वाटतो तितकाच टेन्शन देणारा देखील ठरतो. याचं कारण म्हणेज आपल्याला गिफ्ट मिळण्याची उत्सुकता असली तरी समोरच्याला काय गिफ्ट द्यायचं याचा विचार करताना डोक्याला ताप होतो. Christmas 2019: 'ख्रिसमस'चा सण साजरा करण्यासाठी सुंदर सजवा तुमचा ख्रिसमस ट्री; या 5 डेकोरेशन आइडियाजची होईल मदत
आता काहीच दिवसावर नाताळ आल्याने जर का यंदा तुम्हीही हा गेम खेळण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक गाईड घेऊन आलो आहोत. तुमच्या पुरुष किंवा महिला मित्र मंडळींसाठी अवघ्या 500 रुपयांच्या आता येणाऱ्या या वस्तू गिफ्ट म्हणून नक्की बेस्ट ठरतील..
बॅग्स
एखादी कस्टमाईझ्ड बॅग तुमच्या मैत्रिणीसाठी बेस्ट पर्याय ठरेल. असं म्हणतात मुलींना आपल्या बॅग मध्ये अनेक गोष्टी करी करायची सवय असते त्यामुळे एखादी छान स्पेस असणारी बॅग त्यांना गिफ्ट मध्ये नक्कीच आवडेल.
झुमके
कानात घालायचे झुमके अलीकडे प्रत्येक मुलीचा वीक पॉईंट ठरत आहेत, त्यामुळे जर का तुम्ही ज्वेलरी देण्याचा विचार करत असाल तर ऑक्सिडाइझड कानातले किंवा नोज रिंग हा कोणालाही शोभेल असा पर्याय आहे. नाताळच्या निमित्ताने खास सांताचे झुमके असणारे कानातले देखील बाजारात पाहायला मिळत आहेत.
क्युट टॉप किंवा स्कार्फ
नाताळ च्या निमित्ताने त्याच थीमचा एखादा क्युट टॉप किंवा स्कार्फ गिफ्ट करून तुम्ही मैत्रणीला खुश करू शकाल. या महिन्यात हळूहळू थंडीचा जोर वाढत असल्याने एखादा स्वेटर टॉप किंवा ओव्हरसाईझ्ड टॉप देखील निवडता येईल. लाल किंवा हिरवा रंग निवडल्यास उत्तम!
कुकीज किंवा केक
जर का तुमची मैत्रीण फूडी असेल तर तिच्यासाठी खाण्याचे पदार्थ देणे हा एकदम बेस्ट पर्याय आहे. नाताळच्या दिवशी एखादा छान केक, पेस्ट्री किंवा कुकीज देऊन तुम्ही तिला खुश करू शकता.
मेकअप बॅग्स
मेकअप प्रोडक्ट्स देणे हे जरा खर्चिक होऊ शकते तयापेक्षा सोप्पं पर्याय म्हणजे मेक अप ठेवण्यासाठी एखादी क्युट व्हॅनिटी बॅग देणे. ही बॅग ट्रॅव्हल करणाऱ्या मैत्रिणींसाठी खूप उपयुक्त आहे.
पूर्वी जेव्हा एखाद्याला गिफ्ट देण्याची वेळ यायची तेव्हा देवाची मूर्ती, किंवा एखादा शो पीस देऊन वेळ भागवता यायची. पण आता त्या व्यक्तीच्या आवडी निवडीचा विचार करून मग गिफ्ट देणे सर्व पसंत करतात. लक्षात ठेवा, सिक्रेट सांता खेळात कोणी गिफ्ट दिलं हे कळत नाही त्यामुळे जर का आपलं गिफ्ट ओळखलं जावं अशी इच्छा असेल तर तुमची एखादी हिंट असणं आवश्यक आहे.