Matru Din 23 | File Images

Matru Din Shubhechha in Marathi: खरंतर जगात मदर्स डे चं सेलिब्रेशन मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी होतं. पण भारतामध्ये आईसाठी अजून एक खास दिवस असतो. श्रावण महिन्यातील अमावस्या अर्थात पिठोरी अमावस्येचा दिवस हा 'मातृदिन' (Matru Din) म्हणून साजरा केला जातो. आईच्या ऋणांची जाणीव ठेवत तिच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मातृदिन. यंदा भारतात हा मातृदिन 14 सप्टेंबर दिवशी साजरा केला जाणार आहे. मग या खास दिवसाचं औचित्य साधत आईप्रति तुमची देखील कृतज्ञता सोशल मीडीयाच्या माध्यमातून WhatsApp Status, Messages, Wishes, HD Images द्वारा शेअर करून हा दिवस थोडा स्पेशल करायला विसरू नका. या दिवसानिमित्त अजून एकदा आईप्रति असलेलं तुमचं प्रेम व्यक्त करा.

आई ही व्यक्ती आपल्या मुलांसाठी दिवसरात्र मेहनत करत असते. त्यांच्या आनंदासाठी स्वतः कळत नकळत अनेक भोग भोगत असते. त्यामुळे तिच्यासाठी कितीही गोष्टी केल्या तरी त्या अपुर्‍या ठरणार आहेत. आईला क्वचितच गिफ्ट्सची अपेक्षा असते. खरं समाधान तिला तिच्या कष्टांचं चीझ होत असल्याचं पहाण्यामध्ये असतं त्यामुळे तुम्हांला त्याची जाणीव आहे याची तिला खात्री करून द्यायला विसरू नका. Bail Pola and Pithori Amavasya 2023 Date: बैल पोळा कधी आहे? जाणून घ्या तारीख, महत्त्व आणि साजरा करण्याची पद्धत .

मातृदिनाच्या मराठी शुभेच्छा

Matru Din 23 | File Images
Matru Din 23 | File Images
Matru Din 23 | File Images
Matru Din 23 | File Images
Matru Din 23 | File Images

 

हिंदू मान्यतांनुसार, पिठोरी अमावस्येदिवशी ज्या मातांची मुलं अल्पायुषी ठरतात किंवा ज्यांना अपत्यप्राती होत नाही अशा महिला पिठोरी अमावस्या व्रत करतात. सामान्यतः बाळाच्या सुदृढ दीर्घायुष्यासाठी महिला पिठोरी अमावस्येदिवशी व्रत करतात म्हणून श्रावण महिन्यातील दर्श अमावस्या 'मातृदिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आईचा आशिर्वाद घेऊन तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची रीत आहे.