Margashirsha Guruvar Vrat 2020 Wishes | Photo credits File Images

Margashirsha Guruvar Vrat 2020 Wishes and Messages in Marathi: मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवार व्रताचा (Margashirsha Guruvar Vrat) आरंभ यंदा 17 डिसेंबर पासून होणार आहे. या गुरूवारी महालक्ष्मी व्रताचा (Mahalaxmi Vrat) पहिला गुरूवार आहे. महाराष्ट्रात घराघरामध्ये या निमित्ताने पूजा- अर्चना करण्याची प्रथा आहे. काही जण केवळ उपवास करून, व्रत कथा वाचून हे मंगलमय पर्व साजरे करतात तर काही घरात महिला घटाची मांडणी करून सकाळ-संध्याकाळ त्याची पूजा करतात. सण म्हटला की आनंद आलाच मग या मंगलमय पर्वाच्या शुभेच्छा तुमच्या मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना, परिवारातील मंडळींना देऊन मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रताच्या शुभेच्छा देत मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरूवारची सुरूवात आनंदात करा. त्यासाठी सोशल मीडियात व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून खास मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्रं, मराठी मेसेजेस पाठवा. Margashirsha Guruvar Vrat Puja 2020: मार्गशीर्ष गुरूवार दिवशी महालक्ष्मीचा घट आकर्षकरित्या असा सजवा (Watch Video).

यंदा 17 डिसेंबरला पहिला मार्गशीर्ष गुरूवार, त्यानंतर 24 डिसेंबरला दुसरा मार्गशीर्ष गुरूवार, 31 डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरूवार तर 7 जानेवारी 2021 ला चौथा मार्गशीर्ष गुरूवार आहे. 7 जानेवारीला चौथा आणि अखेरचा गुरूवार आहे. या दिवशी महिला एकमेकींच्या घरी जाऊन वाण व हळदी-कुंकू देतात.

मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या शुभेच्छा

Margashirsha Guruvar Vrat 2020 Wishes | Photo credits File Images

मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत

तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला

सुख, समृद्धी, शांती, सौख्य  घेऊन येवो!

Margashirsha Guruvar Vrat 2020 Wishes | Photo credits File Images

मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या मंगलमय शुभेच्छा

Margashirsha Guruvar Vrat 2020 Wishes | Photo credits File Images

मार्गशीर्ष मासारंभ

या मंगलमय महिन्याच्या

तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!

Margashirsha Guruvar Vrat 2020 Wishes | Photo credits File Images

मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या हार्दिक शुभेच्छा

Margashirsha Guruvar Vrat 2020 Wishes | Photo credits File Images

सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके

शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते।

मार्गशीर्ष गुरूवात व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!

आजकाल महालक्ष्मी व्रतासाठी घट मांडणीसाठी खास महालक्ष्मीचे मुखवटे बाजारात उपलब्ध आहेत. या मुखवट्यांची पूजा करून मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली जाते. श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना देखील अनेक धार्मिक व्रत-वैकल्यांच्या दिवसांनी भरलेला आहे. या महिन्यात विवाह पंचमी, गीता जयंती, दत्त जयंती साजरी केली जाते. त्यामुळे महिनाभर अनेक सण-समारंभांची रेलचेल असते.