श्री महालक्ष्मी (Photo Credit : Youtube)

Margashirsha Guruvar Mahalaxmi Vrat 2019:  यंदा 28 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या मार्गशीर्ष महिन्यातील ( आज (12 डिसेंबर) तिसरा गुरूवार आहे. श्रावण महिन्या इतकेच मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक महत्त्व आहे. या महिन्यात दर गुरूवारी महालक्ष्मी म्हणजेच वैभवलक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे. दर गुरूवारी घरामध्ये घटाच्या स्वरूपात लक्ष्मीची स्थापना करून महालक्ष्मी किंवा वैभवलक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच दिवसभर उपवास करून मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी गुरूवार व्रत केले जाते. मग जाणून घ्या आज मार्गशीर्ष गुरूवात व्रतामध्ये पूजा मांडणी कशी कराल? गुरूवार व्रत कथा नेमकी काय आहे तसेच दिवसभर हे व्रत कसे कराल?  Margashirsha Guruvar Mahalaxmi Aarti: महालक्ष्मी आरती करून आजच्या मार्गशीर्ष गुरूवार व्रताची करा सांगता!

महालक्ष्मी गुरूवार व्रत पूजा विधी

महालक्ष्मी घटाची मांडणी सकाळच्या वेळेस करून सकाळी आणि संध्याकाळी त्याची पूजा करावी, आरती करावी. उपवास असल्यास तो गुरूवारी संध्याकाळी सोडण्याची प्रथा आहे. तर दुसर्‍या दिवशी सकाळी (शुक्रवार) महालक्ष्मी व्रत पूजेतील पानं, फुलं निर्माल्यात टाकावीत तर कलशामधील पाणी तुळशीच्या रोपाला वाहण्याची प्रथा आहे. घटावरील नारळचा प्रसादामध्ये किंवा शाकाहारी जेवणात वापर करावा. Margashirsha Guruvar Vrat 2019 Dates: यंदा मार्गशीर्ष गुरूवार व्रत कोणत्या 4 दिवशी केले जाणार?

जे कुणी श्री महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील, त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उतू नये, नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन-चिंतन करावे; म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील; तुमची कामना पूर्ण करील. अशी भाविकांची श्रद्धा आहे.