Happy Margashirsha Guruvar 2020 Messages: मार्गशीर्ष मासाला प्रारंभ झाला असून आज महिन्यातील पहिला गुरुवार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. महाराष्ट्रातील अनेक सुवासिनी अगदी मनोभावे हे व्रत करतात. प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचा घट स्थापन केला जातो. त्याची साग्रसंगीत पूजा करुन आरती केली जाते. पोथीवाचन होते. या दिवशी उपवास केला जातो. संपूर्ण महिलावर्गासाठी आनंदी, उत्साही आणि भक्तीमय असा हा महिना असतो. या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांना देण्यासाठी खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, Messages, Wishes, SMS, Greeting, शुभेच्छापत्रं. हे तुम्ही सोशल मीडियाच्या विविध माध्यम फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर करुन मार्गशीर्ष गुरुवारचा दिवस अधिक भक्तीमय करु शकता.
मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन केले जाते. महिला वर्गामध्ये हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम रंगतो. वाण देऊन महिला हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. मसाले दूधाचा बेत होतो आणि या सगळ्या सोबत व्रताची सांगताही होते. (मार्गशीर्ष गुरूवार व्रत मराठी शुभेच्छा HD Images, Wallpapers द्वारा देऊन मंगलमय करा महालक्ष्मी व्रताचा दिवस)
मार्गशीर्ष गुरुवार च्या शुभेच्छा!
आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरूवार,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
महालक्ष्मीव्रताच्या हार्दिक शुभेच्छा!
मार्ग - मार्ग नेहमी असा असावा की जिथे
शीर्ष - शीर्ष नेहमी नम्रतेने झुकलेले असावे
गुरु -गुरु असा असावा की ज्याच्याकडून
वार - वारंवार मार्गदर्शन लाभावे!
मार्गशीर्ष गुरुवारच्या तुम्हाला आणि तुमच्या
परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण असा
प्रत्येक दिवस असावा..
येणारा प्रत्येक सण तुमच्या स्वप्नांची पूर्ती
आणि भरभराटीचा असावा हीच देवा चरणी इच्छा…
मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा…
मार्गशीर्ष महिन्यातील
पहिल्या गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा...!
कोविड-19 संकटामुळे मोठ्या प्रमाणावर हळदी कुंकूवाचा कार्यक्रम साजरा करता आला नाही तर नाराज होऊ नका. शुभेच्छापत्रांद्वारे आपल्या मैत्रिणींपर्यंत शुभेच्छा संदेश पोहचवून भक्तीभाव वाढवू शकता.