Mahalaxmi Guruvar Vrat 2019: महालक्ष्मी गुरूवार व्रत (Margashirsha Guruvar Vrat) हे मार्गशीर्ष महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे. यंदा 28 नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात झाली आहे. दरम्यान या महिन्यात दर गुरूवारी महालक्ष्मीची पूजा करून घरात धन, धान्य समृद्धी, सुख आणि शांती नांदावी याकरिता प्रार्थना केली जाते. दरम्यान आज (5 डिसेंबर) दुसरा गुरूवार असल्याने घरात महालक्ष्मीची घरात घटाच्या स्वरूपात स्थापना करून पूजा केली जाते. तर यादिवशी उपावास करून हे महालक्ष्मी व्रत केले जाते. Margashirsha Guruvar Vrat 2019: मार्गशीर्ष व्रताच्या पूजेला बसण्याआधी महिलांनी चुकूनही करु नका ही '5' कामे.
महालक्ष्मी व्रत पूजा घटमांडणी कशी कराल?
- घटमांडणीच्या करण्यापूर्वी घरातील पूजेची जागा स्वच्छ करून घ्या. पाट किंवा चौरंगावर कापड पसरून त्यावर गहू/तांदूळ मूठभर पसरा.
- तांब्याचा कलशावर हलदी कुंकवाच्या पाच उभ्या रेघा आखून ठेवा. कलशात दूर्वा, पैसा आणि सुपारी घाला.
- विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा.
पाटावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो ठेवावा किंवा घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर वा पाटावर ठेवावी. मूर्तीपुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर अथवा गूळ ठेवावा.
- घट मांडल्यावर श्री महालक्ष्मी व्रत कथा वाचासर्वांना प्रसाद द्यावा. Margashirsha Guruvar Vrat 2019 Dates: यंदा मार्गशीर्ष गुरूवार व्रत कोणत्या 4 दिवशी केले जाणार?
महालक्ष्मी घटाची मांडणी सकाळच्या वेळेस करून सकाळी आणि संध्याकाळी त्याची पूजा करावी, आरती करावी. उपवास असल्यास तो गुरूवारी संध्याकाळी सोडण्याची प्रथा आहे. तर दुसर्या दिवशी सकाळी (शुक्रवार) महालक्ष्मी व्रत पूजेतील पानं, फुलं निर्माल्यात टाकावीत तर कलशामधील पाणी तुळशीच्या रोपाला वाहण्याची प्रथा आहे. घटावरील नारळचा प्रसादामध्ये किंवा शाकाहारी जेवणात वापर करावा.
यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरूवार आहेत. शेवटच्या म्हणजेच 19 डिसेंबरच्या गुरूवारी सवाष्ण महिला एकमेकींच्या घरी जाऊन हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात या दिवशी मसाले दूधाचेही वाटप केले जाते.