
Marathwada Mukti Sangram Din 2021: यंदा मराठवा़डा मुक्तीसंग्राम चा 73 वा वर्धापन दिन आहे. दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वातंत्र्य झाला. मात्र निजामाच्या ताब्यात असलेल्या हैदराबाद संस्थानामध्ये महाराष्ट्रातील 8 जिल्हे होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी मराठवाडा स्वातंत्र्य झाला. यासाठी उभारलेल्या लढ्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्राम दिना दिवशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. आज या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा (Marathwada Liberation Day) तुमच्या मराठवाड्यातील मित्रमंडळींना, नातेवाईकांना खास शुभेच्छापत्र, ग्रीटिंग्स (Greetings), इमेजेस (Images), मेसेजेस (Messages) च्या माध्यमातून शेअर करून आजचा दिवस साजरा करा.
संग्राम मराठवाडा मुक्ती संग्रामचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलं. भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 दिवशी लष्करी फौजा निजामाच्या संस्थानामध्ये घुसवल्या. या कारवाईला पोलिस अॅक्शन असेही म्हणतात. अखेर 17 सप्टेंबरला निजाम भारत सरकारला शरण आला आणि हैदराबाद संस्थान भारतामध्ये समविष्ट झाले. (Marathwada Liberation Day 2021: मराठवाडा मुक्तिसंग्राम 73 वा वर्धापन दिन सोहळा, नांदेड इथे पहा लाईव्ह)
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा!



मराठवाडा मुक्तीचा इतिहास चिरंतन राहावा म्हणून औरंगाबाद मध्ये मुक्ती स्तंभ उभारण्यात आला आहे. मराठवाडा मुक्ती दिन संग्राम म्हणून या ठिकाणी दरवर्षी 17 सप्टेंबरला शासकीय कार्यक्रम केले जातात.